ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्याकांडातील सर्व आरोपींना तळोजा तुरुंगामध्ये हलविणार; न्यायालयाची मंजूरी

नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला अमरावतीतील उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर समर्थन दर्शवले. ( Umesh Kolhe Murder Case ) त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडी ठेवण्यात आले होते.

जेल
जेल
author img

By

Published : Jul 27, 2022, 10:49 PM IST

Updated : Jul 28, 2022, 6:45 AM IST

मुंबई - भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला अमरावतीतील उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर समर्थन दर्शवले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाणला कारागृहातील इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला. या आरोपींनी दुसऱ्या कारागृहामध्ये पाठवण्यात यावे याकरिता अर्ज केला. या अर्जाला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने आणि एनआयएनेदेखील सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना तळोजा कारागरामध्ये पाठविण्याची शक्यता आहे.

एनआयएने देखील सहमती दर्शवली - या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाण वर कारागृहातील इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या कारागृहातून त्यांची दुसऱ्या कारागृहामध्ये पाठवण्यात यावे याकरिता अर्ज करण्यात आला होता. या अर्जाला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने आणि एनआयएने देखील सहमती दर्शवली आहे त्यामुळे या सर्व आरोपींना तलोजा कारागरामध्ये पाठवण्याची शक्यता आहे.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन - शाहरूख पठाण व इतर कैदी आर्थर रोड तुरुंगात बोलत होते. त्यावेळी कोणाला कोणत्या कारणावरून अटक झाली याबाबत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटक झाल्याचे पठाणने सांगितले आहे. त्यावेळी कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण चव्हाण ऊर्फ आवन व संदीप जाधव या आरोपींनी पठाणवर हल्ला केला.

कारागृह रुग्णालयातच उपचार करण्यात आले - आर्थर रोड कारागृह येथील सर्कल क्रमांक 11 मधील बराक क्रमांक 2 मध्ये हा वाद झाला आहे. याबाबतची माहिती तुरुंग सुरक्षा रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पठाणला इतर आरोपींपासून वेगळे केले. पठाणच्या हाताला व गळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारागृह रुग्णालयातच उपचार करण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आर्थर रोड तुरुंग प्रशासनाने पठाणवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. तुरुंग अधिकारी अमोल चौरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तुरुंगाची शांतता भंग करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शनिवार (दि.23) जुलै रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) रोजी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सर्व आरोपींना पुढील तपासासाठी एनआयएने ताब्यात घेतले - अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार इरफान खान याचाही समावेश आहे. आरोपी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी एनआयएने ताब्यात घेतले होते.

हेही वाचा - Uddhav Thackeray Birthday : प्रतिज्ञापत्र, शिवसैनिकांची भेट, आपुलकीचा संवाद; वाढदिवस मात्र निमित्त...?

Last Updated : Jul 28, 2022, 6:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.