ETV Bharat / city

Sushilkumar Shinde Mobile Stolen : मी मोबाईल चोरला नाही; फक्त उचलून बाजूला ठेवला, आरोपीने केला पोलिसांकडे खुलासा - stole Congress leader sushilkumar shinde mobile

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा प्रवासादरम्यान मोबाईल चोरण्याचा (sushilkumar shinde mobile theft) प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव मंदार प्रमोद गुरव आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून मंदार सोलापूरच्या माढा तालुक्यातील घाटणे गावचा आहे. मात्र, पोलीस चौकशीत मंदारने मी मोबाईल चोरत नव्हतो तर फक्त सीटवरून बाजूला ठेवण्यासाठी उचलला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Former Congress minister Shinde mobile stolen)

Sushilkumar Shinde Mobile Stolen
Sushilkumar Shinde Mobile Stolen
author img

By

Published : Oct 10, 2022, 7:53 PM IST

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा प्रवासादरम्यान मोबाईल चोरण्याचा (sushilkumar shinde mobile theft) प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव मंदार प्रमोद गुरव आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून मंदार सोलापूरच्या माढा तालुक्यातील घाटणे गावचा आहे. मात्र, पोलीस चौकशीत मंदारने मी मोबाईल चोरत नव्हतो तर फक्त सीटवरून बाजूला ठेवण्यासाठी उचलला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (Former Congress minister Shinde mobile stolen)

आरोपीला अटक - तरुण आरोपी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा असल्याचे उघडकीस आले आहे. सिद्धेश्वर एक्सप्रेसने सुशीलकुमार शिंदे मुंबईला येत असताना हा प्रकार घडला. शिंदे दादर स्टेशनला पोहोचण्याआधी त्यांनी सीटवर ठेवलेला मोबाईल चोरताना शिंदेंनी पाहिलं आणि त्याबाबत पोलीस कॉन्स्टेबलला सांगितलं. चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील घाटणे गावचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सुशीलकुमार शिंदेही मूळ सोलापूरचे आहेत. हा निव्वळ योगायोग आहे. चोराने कुठल्या कारणास्तव पाठलाग करुन त्यांचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, मंदार हा आरोपी देखील त्याच एक्प्रेसने प्रवास करत होता. त्याने शिंदे यांचा पाठलाग केला नसून बसण्यासाठी सीटवर बसताना मोबाईल उचलला, असा दावा पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.