मुंबई: घाटकोपर मधील 2011 मध्ये वृद्ध 60 वर्षाची आई आणि भावाच्या हत्या प्रकरणात आरोपी भावाला मुंबई सत्र न्यायालयाने Bombay Sessions Court दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात Bombay Sessions Court धाव घेतलेल्या आरोपीला न्यायालयाने दिलासा देत निर्दोष सुटका केली आहे. तसेच न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, संशय कितीही मजबूत असला तरी पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
11 वर्षानंतर आरोपातून निर्दोष मुक्तता सर्व पुरावे लक्षात घेता तक्रार कर्त्याने दिलेल्या तक्रारीमध्ये सोन्या पलीकडे काहीही सिद्ध करू शकले नाही, म्हणजे आरोपीने त्याची आई आणि भावाची हत्या केली असे सिद्ध होण्यासाठी कुठलेही पुरावे खंडपीठांसमोर सादर करू शकले नाही. न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने आरोपी गोपाल शिवराम कृष्णन निर्दोष सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. आरोपीला 11 वर्षानंतर आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं फिर्यादीच्या म्हणण्यानुसार घटना 19 एप्रिल 2011 रोजी घडली होती. आरोपी गोपाल शिवराम कृष्णन मुंबई विद्यापीठामध्ये कर्मचारी होता. सायंकाळी 8.15 च्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घाटकोपरमधील त्यांच्या घरात त्यांची आई आणि भाऊ दोघेही मृतावस्थेत पडलेले पाहिल्यानंतर घाटकोपर पोलिसांना संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले. वृद्ध महिलेचा कापडाच्या तुकड्याने गळा आवळून खून करण्यात आला होता, तर लहान भावाचा डोक्याला गंभीर मार लागलेला होता. आणि भाऊ बाथरूममध्ये पडलेला होता. गोपाल शिवराम कृष्णन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचा दावा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर काही दिवसाने या प्रकरणात मृत व्यक्तीच्या खुनाच्या आरोपाखाली तक्रारदार मोठ्या भावाला आरोपी गोपाल शिवराम कृष्णन अटक केली होती. प्रेम संबंधाच्या मुद्द्यावरून त्याने स्वतःची आई आणि भावाचा सकाळी फोन करून, त्यानंतर तो कामावर मुंबई विद्यापीठांमध्ये गेला असा दावाही पोलिसांनी केला होता.
जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पोलिसांकडे आरोपीच्या चुलत भावासह 10 साक्षीदार तपासले होते. सत्र न्यायालयाने साक्षीदारांच्या दबावाच्या आधारे आरोपीला 18 जुलै 2012 रोजी गोपाल शिवराम कृष्णनला दोषी ठरवून त्याच्या अंथरुणावर झोपलेल्या आई आणि लहान बेरोजगार भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
असा युक्तिवाद केला आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या निकाला विरोधात धाव घेतली होती. त्यावेळी आरोपीने असा दावा केला होता की, त्याचा गुन्ह्याशी संबंध जोडणारा कोणताही पुरावा नाही. ट्रायल कोर्टाने केवळ मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या संभाव्य वेळेच्या आधारे त्याला दोषी ठरवले होते. ज्याने डॉक्टरांनी सांगितले होते. पोस्टमार्टम त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, फिर्यादीने मांडलेल्या हेतूला समर्थन देणारा कोणताही पुरावा नाही. दोषसिद्ध हे केवळ डॉक्टरांनी दिलेल्या अनुमानांवर आधारित आहे, असे याचिकेत आरोपीच्या वतीने म्हटले होते.
हेतूबद्दल साक्ष दिली नाही फिर्यादीच्या वतीने तपासलेल्या एकही साक्षीदाराने हत्यामागील हेतू काय हे सांगू शकले नाही. हे लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद मान्य करत, यावर खंडपीठाने म्हटले की याचिकाकर्त्याने केलेल्या आरोपाप्रमाणे एकही साक्षीदार हत्या संदर्भातील ठोस हेतू, एकाही साक्षीदाराने या हेतूबद्दल साक्ष दिली नाही.
शवविच्छेदन करणार्या डॉक्टरांनी शवविच्छेदनाच्या 12 ते 18 तास आधी घटनेच्या तारखेला सकाळीच खून केल्याचे मत मांडले होते, असा दावा फिर्यादी पक्षाने केला होता. तरी खटल्यापूर्वी त्यांनी दिलेल्या साक्षीत उच्च न्यायालयाने हे लक्षात घेतले. डॉक्टरांनी मृताच्या मृत्यूची कोणतीही संभाव्य वेळ दिलेली नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.