मुंबई - संपूर्ण जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूविरोधात लढाई लढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मास्क घालणाऱ्यासंदर्भात नुकताच डिजीटल इंडिया फाउंडेशनचे सर्वेक्षण अहवाल जाहीर झाला ( Digital India Foundation Report ) आहे. ज्यामध्ये मुंबईत मास्क वापरणाऱ्यांची संख्या देशभरात सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली ( Highest Number of Mask Users Mumbai ) आहे. मुंबईत ७६.२८ टक्के तर पुण्यात ३३.६० टक्के नागरिक मास्क वापरतात, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मुंबईतील ७६.२८ टक्के नागरिक मास्क वापरतात -
कोरोना विरोधातील लढाई जागरूकतेने लढली जात आहे. संसर्गातून पसरणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नियमित मास्कचा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, साबणाने स्वच्छ हात धुणे, सॅनिटाझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. इतकेच नाही तर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडून जोरदार कारवाई ( BMC Action on Without Mask People ) सुद्धा करण्यात येत आहे. तरीही नागरिक विना मास्क फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकताच डिजीटल इंडिया फाउंडेशनकडून देशातील कोणत्या शहरात किती नागरिक मास्क वापरतात याचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल ( Digital India Foundation Report ) प्रकशित झाला असून संपूर्ण देशात मुंबईत मास्क वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली ( Highest Number of Mask Users Mumbai ) आहेत. मुंबईत मास्क वापरणाऱ्यांची संख्या ७६. २८ टक्के तर पुण्यात ३३.६० टक्के नागरिक मास्कचा वापरत करत असल्याची माहिती समोर आली आहे.
'अशी' आहे आकडेवारी -
शहरांची नावे | मास्क वापरणाऱ्यांची संख्या ( टक्केवारीमध्ये ) |
मुंबई | ७६.२८ |
पुणे | ३३.६० |
हैद्राबाद | ४५.७५ |
शिमला | ४०.५९ |
कोलकाता | ४०.५५ |
जम्मू | ३९.४० |
चेन्नई | ३८.९० |
गुवाहाटी | ३८.८३ |
दिल्ली | ३८.२५ |
चंदीगढ | ३६.३० |
रायपूर | २८.१३ |
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत २० हजार ३१८ नवे कोरोनाग्रस्त, पाच मृत्यू