ETV Bharat / city

Sharadiya Navratri festival 2022 : पीओपी शिवाय पर्याय नाही मूर्तिकारांची कैफियत - Sharadiya Navratri festival 2022

राज्य सरकारने यावर्षी पीओपीच्या मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांना परवानगी दिल्याने गणेश मूर्ती आणि देवीच्या मूर्ती तयार झाल्या. पुढील वर्षी पीओपी वर राज्य सरकारने पूर्णतः बंदी आणण्याचा विचार केला असला तरी ही बाब शक्य होणार नाही, पीओपी शिवाय गणपती आणि देवीच्या मूर्तींना ( Idols of Goddess POP ) पर्याय नाही अशी ठाम भूमिका मूर्तिकारांनी घेतली आहे. ( According To Sculptors There is No Alternative Without POP )

Sharadiya Navratri festival
शारदीय नवरात्रोत्सव 2022
author img

By

Published : Sep 17, 2022, 7:31 PM IST

मुंबई - राज्यात विशेषता मुंबईमध्ये गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात यंदा साजरा झाला. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी हजारो गणेश मूर्ती यंदा तयार करण्यात आल्या. कोरोना नंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाल्याने गणेश मूर्तींची मागणी वाढली होती मात्र शेवटच्या महिन्यात गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे कामगारांवर आणि मूर्ती कारांवर प्रचंड ताण आल्याचे सतीश वळवडीकर यांनी सांगितले. ( According To Sculptors There is No Alternative Without POP )

पीओपी शिवाय पर्याय नाही मूर्तिकारांची कैफियत

पीओपीच्या दरातही दीडपट वाढ - प्रदूषणाला धोका पोहोचू नये यासाठी कागदाच्या आणि शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्यावर भर देण्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मात्र मूर्ती बनवण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिस हे मजबूत असल्याने त्याचा अधिक वापर होतो तसेच त्याला आकार देणे आणि साच्यात घालून ताबडतोब मूर्ती तयार करता येणे हे सहज शक्य होते प्लास्टर ऑफ पॅरिसचे जरी विघटन होत नसले तरी सरकारने त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जर बनवल्या गेल्या नाही तर ग्राहकांची मागणी पूर्ण होणार नाही असेही वळीवडेकर यांनी सांगितले.

पीओपी शिवाय पर्याय नाही - सध्या मुंबईतील चित्र शाळांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ( Sharadiya Navratri festival ) देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र या कामासाठी आपल्याला केवळ आठवड्याचा वेळ मिळाला त्यामुळे अनेक ग्राहकांची मागणी पूर्ण होऊ शकत नाही त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किमतीतही दीडपट वाढ झाली आहे त्यामुळे मूर्तींच्या किमतीतही वाढ करण्यात आली. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणली असली तरी ते शक्य नाही कारण प्लास्टर ऑफ पॅरिस शिवाय सण उत्सव साजरे होणे शक्य नाही. सरकारने यावर योग्य तोडगा काढावा, असे मूर्तिकार उदय खातू यांनी सांगितले.

मूर्तिकारांना जागा मिळावी -मुंबईतील मूर्तिकारांना शेवटच्या क्षणी परवानगी देण्यात आल्याने खूपच अडचणी झाल्या मुंबईमध्ये जागेची आणि कामगारांची मोठी वाढवा निर्माण झाली आहे त्यामुळे जर सरकारने या उद्योगाकडे कला संस्कृती जपणारा उद्योग म्हणून पाहिले तर हा उद्योग वर्षभर चालू शकतो त्यामुळे या उद्योगासाठी योग्य अशी शासकीय अशासकीय जागा मूर्तिकारांना देण्यात यावी. मुंबईतील सर्व चित्रशाळा अथवा मूर्तिकार एका छताखाली आपले काम वर्षभर करू शकतील अशी जागा दिल्यास मूर्तिकारांच्या अडचणी संपुष्टात येतील आणि योग्य प्रकारे सण उत्सव साजरी करण्यासाठी मूर्तींची निर्मिती करता येईल, तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती ही होईल असेही सतीश ओळीवडेकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.