मुंबई - लता मंगेशकर यांना करोनाची बाधा झाल्याने त्यांना (Lata Mangeshkar Corona Positive) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, (Lata Mangeshkar admitted to Breach Candy Hospital) अशी माहिती मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड झाल्यानंतर लता मंगेशकर यांनाही न्यूमोनिया झाला आहे, ज्याला कोविड न्यूमोनिया म्हणतात.
आयसीयूत ठेवण्यात आले आहे
लता मंगेशकर यांनी शनिवारी कोरोना चाचणी केली होती. मंगळवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पेडररोड परिसरातील आणि घरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वयानुसार त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले आहे. डॉक्टर प्रतित सोनवणे यांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत. परंतु, कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्या गोंधळल्या असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
डिस्चार्जला होऊ शकतो विलंब
लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांनी देखील लता दिदींच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली. कोरोनाचे निदान झाल्याने कोणीही त्यांना भेटू शकत नाही. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. वयोमान आणि शारीरिक व्याधींमुळे त्यांना लगेच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. त्या लवकर ठणठणीत व्हाव्यात, अशी अपेक्षा देखील उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू -
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असे म्हटले जाते. दरम्यान, लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.
हेही वाचा - PM Security Breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग; सर्वोच्च न्यायालय आज समितीबाबत आदेश देणार