मुंबई - विक्रोळी सर्व्हिस रोडवर गाडी खाडीत कोसळल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात-
मुलुंड मधील राहणारे रहिवासी संजय सोनी व त्यांच्या पत्नी व दोन मुली या स्विफ्ट गाडीने मुबंईच्या दिशेला जात होते. दरम्यान, विक्रोळी कंजूरमार्ग सर्व्हीस रोडवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी विक्रोळी कंजूरमार्ग सर्व्हिस रोड लगत असलेल्या खाडीत कोसळली. त्यामुळे अपघात झाला. यावेळी संजय सोनी यांची मोठी मुलगी गाडी चालवत होत्या.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून गाडी बाहेर काढली. या अपघातामुळे काही काळ विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावर गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईलमध्ये परस्पर फेरफार; गुन्हा दाखल