ETV Bharat / city

AC Local Train On Harbour Line : हार्बर मार्गावर सोमवारपासून 16 वातानुकूलित लोकल; 'असं' असेल वेळापत्रक

author img

By

Published : Jan 1, 2022, 8:04 PM IST

हार्बर मार्गावरून यापुढे 16 वातानुकूलित लोकल धावणार ( Ac Local Train On Harbour Line ) आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर सुरु असलेली वातानुकूलित लोकल सेवा बंद केली जाणार आहे. त्याऐवजी त्या मार्गावर सर्वसामान्य लोकल धावणार आहे.

Ac Local Train On Harbour Line
Ac Local Train On Harbour Line

मुंबई : नवीन वर्षाच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus ), गोरेगाव, वाशी, पनवेल आणि वांद्रे स्थानकाच्या दरम्यान सोमवार पासून 16 वातानुकूलित लोकल ( Ac Local Train On Harbour Line ) धावणार आहेत. तसेच, अल्पप्रतिसादामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर सुरु असलेली वातानुकूलित लोकल सेवा बंद करून त्याऐवजी सर्वसामान्य लोकल धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

30 जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू झाली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल धावत आहे. मात्र, वातानुकूलित लोकलचे भरमसाट तिकिट मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यातच सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने अन्य गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

दरम्यान, ट्रान्सहार्बर मार्गावर धावणाऱ्या १६ एसी लोकलला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे, मध्य रेल्वेने या १६ वातानुकूलित लोकलचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत सोमवार पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगाव, वाशी, पनवेल आणि वांद्रे या स्थानकादरम्यान या लोकल धावतील.

म्हणून 'या' मार्गावरील वातानुकूलित लोकल बंद

ट्रान्सहार्बर मार्गावरील 16 वातानुकूलित लोकल सेवा बंद करण्याबाबत रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, या मार्गावरील लोकल सेवांना प्रवाशांचा अत्यंत अत्यल्प प्रतिसाद होता. त्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील वातानुकूलित सेवा बंद करुन सोमवार पासून सर्वसामान्य लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात ट्रान्सहार्बर मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची संख्या ही १ हजार १९७ इतकी होती. म्हणजे प्रतिदिवस फक्त ४० प्रवासी प्रवास करत होते. म्हणून मध्य रेल्वेने या 16 वातानुकूलित लोकलचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला गेला.

वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक

वांद्रे - सीएसएमटी : पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी
सीएसएमटी- पनवेल : पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी
पनवेल- सीएसएमटी : सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी
सीएसएमटी - वांद्रे : सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी
वांद्रे - सीएसएमटी : सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी
सीएसएमटी- गोरेगांव : सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी
गोरेगांव- सीएसएमटी : सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी
सीएसएमटी - वाशी : सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी
वाशी- सीएसएमटी : दुपारी ४ वाजून ४४ मिनिटांनी
सीएसएमटी - गोरेगांव : संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी
गोरेगांव - सीएसएमटी : संध्याकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी
सीएसएमटी- वाशी संध्याकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी
वाशी - सीएसएमटी : रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी
सीएसएमटी- पनवेल : रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी
पनवेल-सीएसएमटी : रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी
सीएसएमटी- वांद्रे : रात्री १२ वाजून ३६ मिनिटांनी

हेही वाचा -Mumbai Police Action : थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक नियमांची पायमल्ली, 1817 जणांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.