ETV Bharat / city

Azmi's Letter To CM : महाविकास आघाडीची चिंता वाढली; अबू आझमी यांचे मुख्यमंत्र्यांना नाराजी पत्र - हितेंद्र ठाकूर यांचा इशारा

आघाडीला (Aghadi Government) पाठिंबा असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष (President of The Socialist Party) आबू आझमी (Abu Azmi) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून (Letter to The CM) आपण खरोखर धर्मनिरपेक्ष आहोत का? असाल तर आमच्या समस्या प्रलंबित का? याचा जाब विचारला आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या काही मागण्या (Minority Demands) त्यांनी सरकारकडे केल्या होत्या. त्या विषयी वेळोवेळी पत्र पाठवूनही त्या मागण्या अजून प्रलंबितच आहेत. (Demands Pending)

Abu Azmi
आबू आझमी
author img

By

Published : Jun 4, 2022, 7:51 PM IST

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. आपल्याच मित्रपक्षांना वाचवण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी धडपड सुरू आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. अबू आझमी यांनी पत्रातून शिवसेनेच्या नवा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याने या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Letter Sent By Abu Azmi
आबू आझमी यांनी पाठवलेले पत्र

किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र येण्याची आठवण : अबू आझमी यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. जातीयवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किमान समान कार्यक्रमांतर्गत महाविकास आघाडीचा पाया घातला गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेण्याच्या अटीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. मात्र, अडीच वर्षे पूर्ण होऊनही सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही." असे आझमी यांनी म्हटले आहे.

पत्रात मांडल्या समस्या : अबू अझमींनी आपल्या पत्रात पुढे म्हटलंय की, "गेल्या अडीच वर्षांत तुम्हाला अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर अनेक पत्र लिहिली, त्यांच्या अनेक समस्या आपणापुढे मांडल्या. पण, तुम्ही एकदाही उत्तर दिले नाही. आघाडीचे सरकार धर्मनिरपेक्ष आहे की नाही हा प्रश्नच पडतो. आजकाल तुम्ही ज्या नव्या हिंदुत्वाविषयी बोलत आहात, तोच आघाडीचा चेहरा आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो. महाराष्ट्र सरकारने अडीच वर्षांत या प्रश्नांवर का कारवाई केली नाही, हे जनतेला समजावून सांगण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे."

हितेंद्र ठाकूर यांचा इशारा : अबू आझमी यांच्यासारखेच बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, 'राज्यसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. आम्ही याबाबत चर्चा करू मगच निर्णय होईल.'

बहुजन विकास आघाडीचे मत महत्त्वाचे : दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाकडे एकूण 3 आमदार असून त्यांची भूमिका विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीत समाजवादी पक्षाला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही - अबू आझमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.