ETV Bharat / city

राज्यात आज 37 हजार 30 लाभार्थ्यांना लसीकरण - corona vaccination update news

राज्यात आज 770 केंद्रांवर 37 हजार 030 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 24,534 लाभार्थ्यांना पहिला तर 12,496 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

vaccination drive
लसीकरण मोहिम
author img

By

Published : Feb 20, 2021, 9:32 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊ नये, म्हणून राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात आज 37 हजार 30 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. आजपर्यंत 8 लाख 97 हजार 413 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड व कोवॅक्सिन ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात आज 770 केंद्रांवर 37 हजार 030 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 24,534 लाभार्थ्यांना पहिला तर 12,496 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 11 हजार 050 आरोग्य आणि 13 हजार 484 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 12,496 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 36,532 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. 498 लाभार्थ्यांना कोवॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 8 लाख 97 हजार 413 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर - 33275

अकोला -11882
अमरावती -20035
औरंगाबाद- 22707
बीड -15248
भंडारा -10252
बुलढाणा -15732
चंद्रपूर- 19839
धुळे- 11667
गडचिरोली -11582
गोंदिया -10426
हिंगोली- 6106
जळगाव -19936
जालना -13198
कोल्हापूर -24661
लातूर -14984
मुंबई -150686
नागपूर 41795
नांदेड -14715
नंदुरबार -13623
नाशिक -38355
उस्मानाबाद -9553
पालघर- 23571
परभणी- 7444
पुणे -89656
रायगड -13243
रत्नागिरी -13063
सांगली- 23318
सातारा -34657
सिंधुदुर्ग -8243
सोलापूर- 30575
ठाणे -82790
वर्धा -17310
वाशीम -7329
यवतमाळ -15957

राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक-

राज्यातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज शनिवारी (दि.20) महाराष्ट्रात 6281 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संक्रमण वाढत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 51 हजार 753 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.16 टक्के तर मृत्यूदर 2.47 टक्के झाला आहे. विदर्भातील स्थिती अधिकच चिंताजनक बनली असून आज एकट्या अमरावती जिल्ह्यात 1058 रुग्ण सापडले आहेत. ही वाढ मुंबई, पुणे या शहरांपेक्षा मोठी असल्याने अमरावतीकरांसाठी चिंतेची बाब आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.