ETV Bharat / city

Abdul Sattar in trouble : शिंदे गटाचे अब्दुल सत्तार अडचणीत? दोन्ही मुलींची घोटाळ्यातील टीईटी प्रमाणपत्रे रद्द - Daughters of Abdul Sattar

शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द केल्याची चर्चा आहे.

Abdul Sattar in trouble
अब्दुल सत्तार अडचणीत
author img

By

Published : Aug 8, 2022, 9:57 AM IST

Updated : Aug 8, 2022, 10:36 AM IST

मुंबई- शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार ( Abdul Sattar in trouble ) अडचणीत आले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे ( TET scam case ) रद्द केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पैसे घेऊन पास कमाजी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या ( TET scam in Maharashtra ) घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहे. परीक्षा परिषदे डून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत.

टीईटी प्रमाणपत्र यादीतील नावे
टीईटी प्रमाणपत्र यादीतील नावे

माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द- हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या ( Daughters of Abdul Sattar ) मुली आहेत. 2020 मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे. ऊजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

नोकरीतून काढून टाकण्यात येण्याची शक्यता- अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवारत असल्याचे सांगण्यात आले.शिक्षक घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे. या घोटाळ्यामध्ये 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पास करण्यात आले होते. त्यांना नोकरीवर घेण्यात आले होते. घोटाळ्यामध्ये जे ७८०० परीक्षा वरती पास झाले होते. त्यांची पात्रता रद्द करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता शिक्षण संचालन या शिक्षकांचा शोध घेणे सुरू केलेला आहे. त्यांच्यावरती कारवाई करणार येणार आहे. त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 2019 आणि 2018 या दोन्ही वर्षी टीटीमध्ये मोठा घोटाळा झालेला होता.

या आर्थिक व्यवहाराची आता ईडी चौकशी करणार आहे. ईडीने तसे कागदपत्र पुणे पोलिसांकडून मागविलेले आहेत. तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील दिलीप वळसे पाटील यांच्या काळात या तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर आता शिंदे फडवणीस सरकार आल्यानंतर पुढील कारवाई होत आहे.

हेही वाचा-TET Scam Case : टीईटी घोटाळा प्रकरणातील 7900 अपात्र उमेदवारांची पत्यासह यादी तयार

हेही वाचा-TET Scam 2018 : टीईटी परीक्षेतील बोगस शिक्षकांची यादी जाहीर.. 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक संख्या.. १७०१ शिक्षक बोगस

Last Updated : Aug 8, 2022, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.