ETV Bharat / city

Devendra Fadnavis : 'आत्मनिर्भर चहा' बेरोजगारी हटवेल - देवेंद्र फडणवीस - आत्मनिर्भर चहा उद्घाटन देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ( Aatmanirbhar Bharat ) ही संकल्पना साकारली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत ओबीसी मोर्चातर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त ( BJP Foundation Day ) ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉलचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 6, 2022, 7:02 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ( Aatmanirbhar Bharat ) ही संकल्पना साकारली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत ओबीसी मोर्चातर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त ( BJP Foundation Day ) ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉलचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यानंतर भाजपा स्थापना दिनानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

गरजूंसाठी भाजपाचे चहा स्टॉल - ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या नेतृत्वाखाली चहा स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉलच्या शाखा सुरू करण्यात येत आहेत. तसेच, येत्या काही दिवसांत ५० शाखा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही नरेंद्र गावकर यांनी सांगितले. यावेळी योगिता मोरे, माधुरी ठाणेकर, अमिता देवळेकर, संगीता पुसळकर, मालती मोरे, सुशील शिरोडकर यांना चहा स्टॉलचे वितरण करण्यात आले.

स्थापना दिनानिमित्त शोभायात्रेचे आयोजन - भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यालयातून मुंबईमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या सहित भाजपा नेते अशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार तमिल सेलवण यांच्यासहित शेकडो भाजपा कार्यकर्ते सामील झाले होते.

हेही वाचा - Islampur Crime : उंदीर मारण्याचे औषध घालून पतीस दिला गुलाबजामून; पत्नीला ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.