ETV Bharat / city

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात- रामदास आठवले - 10th, 12th exams

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या हजारोच्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी,बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात- रामदास आठवले

author img

By

Published : Apr 7, 2021, 3:08 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णसंख्या हजारोच्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे राज्यात दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी-

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे. त्या प्रमाणेच 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राज्यात शनिवारी आणि रविवारी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या शनिवारच्या पेपरच काय करायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनसेचीही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची मागणी-

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील केली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पास करा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.