मुंबई - राज्यात जनावरांना लम्पी या आजाराची लागण झाली आहे. या आजाराची लागण माणसाला होत नाही, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतरही मुंबईमधील दूध पुरवठ्यावर परिणाम झाला (supply of Aarey Milk) आहे. पालिका रुग्णालयात 'आरे' चा दूध पुरवठा बंद झाल्याने रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला (supply of Aarey Milk stopped in municipal hospital) आहे. आरेचा दूध पुरवठ्यात अडचण निर्माण झाल्याने लवकरच महानंदा डेअरी दररोज तीन ते चार हजार लिटर दूध पुरवठा करणार आहे.
आरेचा दूध पुरवठा बंद - महापालिकेच्या रुग्णालयात मुंबई राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी (municipal hospital in Mumbai) येतात. रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण लवकर बरा व्हावा, यासाठी त्यांना रुग्णांना सकाळी नाश्ता देण्यात येतो. ब्रेड, कांदा पोहे, चहा, असा वेगवेगळा नाश्ता देण्यात येत असून एक ग्लास दूध देण्यात येते. आरे दूध डेअरी कडून रोज तीन हजार लिटर दूध पुरवठा होत होता. त्यामुळे मुंबई महापालिकेत आता महानंदा डेअरीकडून दूध घेणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आरेचा दूध पुरवठा होत नसल्याने रुग्णांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
लम्पीचा आजाराचा धोका नाही - आरेकडून दूध पुरवठा होत नसल्याने रुग्णांसाठी महानंदा डेअरी कडून दूध घेण्यात येणार आहे. लम्पी आजारामुळे आरेचे दूध बंद झाले, असे (lumpy disease supply of Aarey Milk stopped) नाही. आरेची अंतर्गत अडचण असल्याने पालिकेने आता महानंदा डेअरीकडून दूध घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच महानंदा डेअरी कडून दूध पुरवठा सुरु होईल, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.