मुंबई - सुपरस्टार आमिर खान हा तुर्कीवरून परत आल्यानंतर कोविड 19 च्या नियमानुसार दोन आठवडे शासकीय वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात यावे, असे भाजपचे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बुधवारी ट्विट करत म्हटले आहे.
त्यांचे ट्विट हे एका अज्ञात हिंदू नॅशनलिस्ट अकाऊंटवरून आलेल्या आमिर खान संदर्भात आलेल्या ट्विटनंतर आले आहे.
मागील काही दिवसात आमिर खान तुर्कीच्या फर्स्ट लेडी इमिन इरोदिगं यांच्या सोबतचा फोटो व्हायरल झाल्याने ट्रोल झाला आहे. तो तुर्कीमध्ये आपल्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी गेला होता.
लाल सिंह चड्ढा 2021 च्या ख्रिसमसमध्ये होणार प्रदर्शित
आमिर खान आणि ख्रिसमसच नातं तस फार जुने आहे. नाताळ दरम्यान प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत, ज्यात 3 इडियट्स, पीके, धूम 3, दंगल इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' टॉम हैंक्सच्या 'फॉरेस्ट गम्प'वर आधारित आहे. लॉकडाउनच्या आधी, चंदिगड आणि कोलकातामध्ये चित्रपटाच्या काही भागाचे शूट झाले आहे. जेव्हा देशातली स्थिती अवघड बनली आहे तेव्हा आमिरने आपल्या चित्रपटाच्या रेकीसाठी तुर्कीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.