ETV Bharat / city

मुंबईसाठी थेट जागतिक बाजारपेठेतून करणार लसींची खरेदी - आदित्य ठाकरे

जागतिक पातळीवर कोरोना लसींची खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लसींची चाचपणी करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

Aaditya Thackeray on vaccination drive mumbai
आदित्य ठाकरे
author img

By

Published : May 11, 2021, 7:00 AM IST

मुंबई - शहरात कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता करण्यासाठी जागतिक पातळीवर लसींची खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लसींची चाचपणी करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना दिल्याचे ते म्हणाले.

सध्या कोरोना प्रतिंबधक लसींसाठी स्मार्टफोनद्वारे संबंधीत ॲपवर नोंदणी करावी लागते. पण या तंत्रज्ञानाची माहिती नसलेले नागरिक तसेच जे कोविन अ‌ॅप ऑपरेट करू शकत नाहीत, अशा नागरिकांनाही लस सुलभरित्या मिळावी याकरिता एक पद्धती तयार करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय मुंबईची लसींची अधिकची गरज पाहता शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याचे आमचे प्रयत्न सतत चालू आहेत. आपल्या विनंतीनंतर मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासह शहरातील प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घेतला आहे. यासंदर्भात तातडीने अंमलबजावणी झाल्याने आता शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढली आहे. शिवाय ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरित्या मिळण्यासाठी मदत होत आहे, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही आज महापालिकेने जारी केल्या आहेत. राज्यातीतील इतर सर्व शहरांनीही 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सुलभरित्या लसीकरण होण्याच्या दृष्टीने त्या त्या शहरांमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण मोहीम घ्यावी, असे आवाहनही मंत्री ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा - म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य योजने'तून मोफत उपचार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.