मुंबई - आज राज्यात २८३४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,९९,३५२ वर पोहोचला आहे. राज्यात आज ५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८,८०१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
राज्यात सध्या ५९,४६९ कोरोना रुग्णांवर उपचार -
आज ६०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांचा आकडा १७,८९,९५८ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात ५९,४६९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत राज्यभरात कोरोना निदानासाठी एकूण १,२१,५७,९५३ तपासण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात ५,०४,९३८ हजार व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट -
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३९५९, १० नोव्हेंबरला ३७९१, १५ नोव्हेंबरला २५४४, १६ नोव्हेंबरला २५३५, १७ नोव्हेंबरला २८४०, २० नोव्हेंबरला ५६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.