मुंबई - मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने (2008)च्या कर्ज फसवणुकीच्या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी कर्मचाऱ्यांसह सात जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने यातील सात आरोपींना पाच वर्षांपासून एक वर्षापर्यंत कारावास आणि 23 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑपेरा हाऊस शाखेकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात एसबीआयने (2008)मध्ये दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित हे प्रकरण आहे.
बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमधील तफावतीकडे दुर्लक्ष केले
जरीना बटालीवाला उर्फ नर्गिस रुसी दिवेन्द्री या आरोपींपैकी एकाने (2008)मध्ये एसबीआयच्या ऑपेरा हाऊस शाखेकडून 1.25 कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. शाखा व्यवस्थापकाने कर्जाची कागदपत्रे बँकेचे क्षेत्रीय अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक यांना दिली होती. त्यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि क्रेडिट प्रोसेसिंग सेलकडे पाठवण्यात आले. जिथे इतर दोन कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. याबाबत एसबीआयने म्हटले आहे की, बँक अधिकाऱ्यांनी कागदपत्रांमधील तफावतीकडे दुर्लक्ष केले आणि योग्य पाहणी न करता कर्ज मंजूर केले, असे एसबीआयने म्हटले आहे.