ETV Bharat / city

मस्जिद बंदर येथील दुकानाला आग, जीवितहानी नाही

अब्दुल रहेमान रोडवरच्या, 'नवरंग' इमारतीमधील तळमजल्यावरील दुकानाला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

a small shop caught fire at masjid bandar no casualties reported
author img

By

Published : Aug 3, 2019, 1:46 PM IST

मुंबई - मस्जिद बंदर येथील एका दुकानाला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात अग्निशमन दलाचा एक अधिकारी धुरामुळे घुसमटून जखमी झाला असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

मस्जिद बंदर येथील अब्दुल रहेमान रोडवरच्या, 'नवरंग' इमारतीमधील एका दुकानाला पहाटे आग लागली होती. या पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावरील 60 बाय 40 फुटाच्या दुकानाला आग लागली. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने, आग आजूबाजूच्या परिसरात पसरू नये म्हणून 12 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. दुकान लहान असल्याने त्यामधील इलेक्ट्रिक वायरिंग, वह्या-पुस्तके व इतर सामान आगीत जळाले.

दुकानात मोठ्या प्रमाणात धूर जमा झाल्याने तसेच धूर बाहेर जायला मार्ग नसल्याने आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या. आग विझवताना धुराचा त्रास झाल्याने मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी पवार यांना जी. टी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून त्यात अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Intro:मुंबई
मुंबईमधील सर्वात गर्दीचा विभाग असलेल्या मस्जिद बंदर येथील एका दुकानाला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एक अग्निशमन दलाचा अधिकारी धुरामुळे घुसमटल्याने जखमी झाला असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.Body:मुंबई मस्जिद बंदर येथील अब्दुल रहेमान रोडवरील नवरंग इमारतीमधील एका दुकानाला पहाटे आग लागली होती. तळ अधिक चार अशी पाच मजली ही इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर 60 बाय 40 फुटाच्या दुकानाला आग लागली. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने आग आजूबाजूच्या परिसरात पसरू नये म्हणून 12 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. दुकान लहान असल्याने त्यामधील इलेक्ट्रिक वायरिंग, वह्या पुस्तके आगीत जळाली. दुकानात मोठ्या प्रमाणात धूर जमा झाल्याने तसेच धूर बाहेर जायला मार्ग नसल्याने आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या. आग विझवताना धुराचा त्रास झाल्याने मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी पवार यांना जी टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून त्यात अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.