ETV Bharat / city

भांडूपमध्ये बेस्ट बसच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू, 2 जण जखमी

भांडूप पश्चिम येथे बेस्ट बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक केबिनवर जाऊन धडकली. या दुर्घटनेत बस आणि इलेक्ट्रिक कॅबिनमध्ये अडकून एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

भांडूपमध्ये बेस्ट बसच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू, 2 जण जखमी
भांडूपमध्ये बेस्ट बसच्या अपघातात वृद्धाचा मृत्यू, 2 जण जखमी
author img

By

Published : Aug 11, 2021, 1:22 PM IST

मुंबई : भांडूप पश्चिम येथे बेस्ट बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक केबिनवर जाऊन धडकली. या दुर्घटनेत बस आणि इलेक्ट्रिक कॅबिनमध्ये अडकून एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या अपघाताप्रकरणी भांडूप पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.

एकाचा मृत्यू, दोन जखमी
भांडूप पश्चिम रेल्वे स्टेशन ते टेंभी पाडा अशी बस क्रमांक 605 ही चालवली जाते. हा मार्ग अतिश अरूंद आहे. अशोक खेडकर चौक इथे रस्त्याला उतरण आहे. या ठिकाणी बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस बाजूच्या इलेल्ट्रीक केबिनवर जाऊन आदळली. याचवेळी समोरून एक रिक्षा येत होती. यादरम्यान रस्त्यावर चालणारे तीन पादचारी नागरिक बस आणि इलेक्ट्रिक केबिनमध्ये अडकले. त्यांना पोलिसांनी बाहेर काढून जवळच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील 70 वर्षीय पुंडलिक भगत या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर रविंद्र तिवारी वय वर्षे 65 आणि मुकेश उपाध्याय वय वर्ष 44 हे दोन जण जखमी झाले आहेत.

बस चालकाला अटक
बसवरील ताबा सुटल्याने इलेक्ट्रिक केबिन आणि बसमध्ये अडकून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याने या अपघाताप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बस चालक बबन माने वय वर्षे 54 यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - तेलंगणातील मेडकमध्ये भाजपा नेत्याला कारमध्ये कोंडून जीवंत जाळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.