नवी मुंबई - लग्न जमवण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने तसेच मृत व्यक्तीच्या मनोरुग्ण भावाच्या नावे केलेल्या रूमच्या बुकिंगचे सहा लाख रुपये हडपण्याचा उद्देशाने पनवेल परिसरात असणाऱ्या वाजे गावाच्या हद्दीत एका तरुणाची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या मित्रासह तिघांना नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे.
२८ जुलैला आढळून आला होता तरुणांचा मृतदेह - २८ जुलैला वाजे परिसरात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांनी तब्बल १५ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा तपास लावला. संबंधित मृतदेह प्रवीण शेलार या व्यक्तीचा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तपास केला असता प्रवीण शेलारचा मित्र नरेश बेटकर व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
लग्न जमवण्यासाठी दिलेले चाळीस हजार रुपये परत देऊ नये म्हणून केली हत्या - वाजे परिसरात आढळलेला तरुणाचा मृतदेह हा प्रवीण शेलार 28 या व्यक्तीचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रवीण हा अविवाहित होता व तो लग्नासाठी मुलगी पाहत होता. लग्न जमवण्यासाठी प्रवीणने नरेश बेटकर (30) ला 40 हजार रुपये दिले होते. मात्र, काही केल्या लग्न जमत नसल्याने प्रविणने ते पैसे परत मागण्यासाठी नरेशकडे तगादा लावला आहे.
तिघांना पोलिसांनी अटक केले - प्रवीणने दिलेले 40 हजार रुपये परत करण्याची इच्छा नसल्याने, तसेच प्रवीणच्या घरात मनोरुग्ण आई व मनोरुग्ण भाऊ असल्याने त्याच्या घरात शोध घेणारी सुज्ञ व्यक्ती नसल्याचा फायदा घेत मृत व्यक्तीच्या आईचा अंगठा घेत त्याच्या भावाने बुकिंग केलेला रूमचा व्यवहार रद्द करून सहा लाख रुपये हडपण्याच्या उद्देशाने ही हत्या केली, असे आरोपीने कबूल केले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी नरेश बेटकर सह तिघांना पोलिसांनी अटक केले आहे.
रॉकेल साह्याने मृताची ओळख पटू नये म्हणून जाळला चेहरा - प्रवीणचा मित्र नरेश याने प्रवीणच्या घरी कोणी सुज्ञ व्यक्ती नसल्याचा फायदा घेत दोन मित्रांच्या साह्याने प्रवीण ची हत्या केली. 25 जुलैला प्रवीणला ज्युपिटर स्कूटी वरून घरून घेण्यासाठी नरेश गेला होता. वाजे परिसरातले निर्जन स्थळी गेल्यावर डोक्यात हल्ला करून प्रवीणचा गळा आवळण्यात आला. याकरिता नरेशला त्याच्या दोन मित्रांनी मदत केली प्रवीणची हालचाल थंड झाल्याचे पाहताच नरेशने व त्याच्या मित्रांनी प्रवीणच्या चेहऱ्यावर ओळख पटू नये, म्हणून रॉकेल टाकले व त्याचा चेहरा जाळला या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
हेही वाचा - Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे अद्याप विरोधी पक्षाला निमंत्रण नाही -अजित पवार