मुंबई - कथित 100 कोटी वसूली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहात आहे. अनिल देशमुख यांचा जवाब नोंदवण्यासाठी आज सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड कारागृहात दाखल झाले आहे. सीबीआयने जबाब नोंदवण्यासाठी मागील आठवड्यात न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने सीबीआयचा अर्ज मंजूर केला. त्यानुसार सीबीआय आर्थर रोड कारागृहात तीन दिवस जबाब नोंदवणार आहे. यापूर्वी सीबीआयने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचे जबाब नोंदवले आहे.
माजी गृहमंत्री देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून पहिली अटक करण्यात आली होती. ठाण्यातून संतोष जगताप या मध्यस्थाला अटक करण्यात आली होती. सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची चौकशी देखील करण्यात आलेली आहे या तिन्ही आरोपींची कारागृहांमध्ये जाऊन सीबीआयने जवाब नोंदविला होता. आता या प्रकरणात अनिल देशमुख यांचा देखील आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जवाब नोंदवणार आहे.
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई येथील घरांसह विविध कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचानलयाकडून छापेमारी करण्यात आली आहे. देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख अडचणीत आले आहेत. गोपनीय कागदपत्रे लीक प्रकरणी सीबीआयने नुकतेच अनिल देशमुखांच्या काही ठिकाणांवर छापेही टाकले होते. केंद्रीय तपास यंत्रणेने देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा शोध घेण्यात आला होता. 2 सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेने देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अटक केली होती. आता काही दिवसांपूर्वीच आनंद डागा यांना जामीन मिळाला आहे.
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर 9 मार्च रोजी सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केले आहे अनिल देशमुख जवळपास चार महिन्यांपासून आर्थर रोड जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मागील महिन्यात युक्तिवाद पूर्ण करण्यात आला मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता 9 मार्च रोजी अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे.
नेमका प्रकरण काय?
100 कोटींच्या वसुलीचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली. मार्च महिन्यात जेव्हा परमबीर सिंग यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आलं त्यानंतर तीन दिवसात परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला 100 कोटी रूपये दर महिन्याला बार आणि रेस्तराँमधून वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं.