मुंबई- मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने एक कविता फेसबुकवरुन शेअर केली ( Controversial post against Sharad Pawar ) आहे. त्यानंतर तिच्या विरोधात कळवा येथील पोलीस स्टेशनमध्ये ( Kalwa Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला ( Crime Against Actress Ketaki Chitale ) आहे.
अखेर गुन्हा दाखल : अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट केलेल्या कवितेनंतर तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच हा वाद आता आणखी ताणला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेसबुकवर केतकीनं केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून, तिच्या पोस्टवरील कमेंटमध्ये नवा वाद सुरु झालाय. याआधीही केतकी चितळेने छत्रपती शिवरायांवरही केलेली पोस्ट चर्चेत आली होती. त्यानंतर पुन्हा एका बऱ्याच दिवसानंतर केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनं वाद उफाळून आलाय. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.
सोशल मीडियावर खिल्ली : शरद पवार यांच्यावर रचलेली एक कविता फेसबुकवरुन शेअर केली. या कवितेमुळे तिची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवली. शरद पवारांचा अपमान करणारी ही कविता असल्याचं म्हणत पवार समर्थकांनी तिच्यावर टीकाही केली. वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ज्या कारणामुळे तिनं पवारांना उद्देशून कविता शेअर केली आहे, त्याचा संदर्भ हा आणखी एका कवितेशी आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेचा दाखला देत शरद पवारांनी साताऱ्यात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. पाथरवट या कवितेवर शरद पवारांनी असं नेमकं काय म्हटलं? की ज्यामुळे केतकी चितळे हीनं फेसबुकवर पोस्ट केली, याची चर्चा आता रंगली आहे.