मुंबई - भाजप आमदार आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) यांनी केलेल्या विधानाबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( BMC Mayor Kishori Pednekar ) यांनी बुधावारी (दि. 8) मरीन लाईन पोलीस ठाण्यात ( Marine Lines Police Station ) दिलेल्या तक्रारीवर आमदार शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्या विधानाबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार नोंदवली होती.
राज्य महिला आयोगाकडून दखल
महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाने दखल घेत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगाला पाठवून देण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी दिले आहेत.
सह आयुक्तांकडे केली कारवाईची मगाणी
तसेच मंगळवारी (दि.7) डिसेंबर रोजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेना नगरसेविकांनी मुंबईचे सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था प्रमुख विश्वास नागरे पाटील यांची भेट घेऊन आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.
काय आहे प्रकरण..?
वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत बालकाचा, त्याच्या वडिलाच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. सिलिंडर स्फोटाची घटना 30 नोव्हेंबरला घडली होती. यानंतर आशिष शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत सिलिंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. असे म्हणत केलेल्या पुढील विधानावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे.
हे ही वाचा - BJP Ashish Shelar Controversy : महापौरांबद्दल मी आक्षेपार्ह विधान केलं नाही - आशिष शेलार