मुंबई - उत्तर प्रदेशमधील एका ९ वर्षाच्या मुलीच्या पोटात जन्मापासून बाळ होते. या मुलीवर मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात ( Sion Hospital Mumbai Municipal Corporation ) यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर ती आता तिचे पुढील आयुष्य सामान्य नागरिकाप्रमाणे जगू शकणार आहे. पीडियाट्रिक सर्जरी ( Pediatric surgery )च्या टिममुळे हे शक्य झाल्याची माहिती सायन रूग्णालयाचे डिन डॉ. मोहन जोशी ( Sion Hospital Dean Dr. Mohan Joshi ) यांनी दिली.
मुलीच्या पोटात ९ वर्ष बाळ -
उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये एका खेड्यात रोशनी ग्यासुद्दीन अन्सारी ही ९ वर्षीय मुलगी राहत होती. गेले ९ वर्ष सतत तिच्या पोटात दुखत असे. लहानपणापासून पोटात दुखायचं तिच्या. या दुखण्याबरोबरच पोटात एक टणक गोळाही वय वाढेल तसा वाढू लागला. तिचे कुटुंबीय अंधश्रद्धेला बळी पडले आणि बुवा साधूकडे जात राहिले. रोशनीचा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. वयाबरोबर हा त्रास वाढतच चालला होता. अखेर रोशनीला तिच्या कुटुंबीयांनी मुंबईला आणले. मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात तपासणी करण्यात आली. सायन रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात वाढणारा तो गोळा नव्हता तर ते चक्क बाळ होते. डोके, दोन डोळे, दोन हात, दोन पाय, कणा हे अवयव होते. परंतु त्यात जीव नव्हता. अखेर पीडियाट्रिक सर्जरीच्या टिमने रोशनीच्या पोटातील हे बाळ ऑपरेशन करून बाहेर काढले आहे.
दुर्मिळ ऑपरेशन -
बाळाच्या पोटात बाळ असण्याच्या केसेस अत्यंत दुर्मिळ असतात आणि जरी समोर आल्या तर त्या पहिल्या चार पाच महिन्यांत समजून येतात. रोशनीलाही लहानपणापासून त्रास होत होता. परंतु तिचे कुटुंबीय अंधश्रद्धेला बळी पडले आणि बुवा साधूकडे जात राहिले. बाळाच्या पोटात बाळ होण्याचे प्रकार अत्यंत दुर्मिळ असतो. रोशनीवर पीडियाट्रिक सर्जन डॉ. पारस कोठारी ( Pediatric Surgeon Dr. Paras Kothari ) यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. यामुळे रोशनी आता पुढील आयुष्य सामान्य नागरिकांप्रमाणे जगू शकणार आहे अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.
हेही वाचा - Omicron Variant : जाणून घ्या ओमिक्रॉन व्हॅरिएन्टविषयीची माहिती, एका क्लिकवर