मुंबई - बेस्टच्या बसमधून प्रवास करताना एका ४ वर्षांच्या मुलाला फिट आली. त्या मुलाच्या आईने आरडाओरडा करताच ( Child medical treatment best bus help ) बसचालक, कंडक्टर, सहाय्यक वाहतूक अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्या मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. यामुळे त्या मुलाला वेळीच उपचार मिळाले. या बेस्ट कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलवून महाव्यवस्थापकांनी त्यांचा सत्कार केला आहे.
हेही वाचा - Notice To Prasad Lad : अद्याप कोणतीही नोटीस नाही; आमदार लाड यांचा खुलासा
४ वर्षाच्या मुलाला फिट -
बेस्टच्या गोरेगाव ते नेहरू तारांगण मार्गावर ३३ क्रमांकाची बस चालते. या बसमधून मंगळवारी दुपारी १२.५५ वाजता शिवम पारकर (वय ४) हा लहान मुलगा आणि त्याची आई प्रवास करत होती. बस सिटीलाईट बस थांब्यावरून पुढे निघाली असताना अचानक बसमधील शिवमची आई आरडाओरडा करू लागली. महिलेच्या आरडाओरडीचा आवाज ऐकूण चालक आणि वाहक त्यांच्याजवळ गेले. शिवमला आकडी आल्याने त्याची दातखिळी बसली होती. त्याची स्थिती पाहून शिवमच्या आईने मदतीसाठी सहाय्य मागितले. बसचालक, कंडक्टर तिथून जाणारे सहाय्यक वाहतूक अधिकारी राजेश विचारे यांनी कंडक्टर आप्पासाहेब लोहार, चालक किशोर दाणे यांना बस ठाकूर रुग्णालयात नेण्यास सांगितले.
कर्मचाऱ्यांचा सत्कार -
ठाकूर रुग्णालयाजवळ बस थांबवून शिवम यास उपचार देण्यासाठी सहाय्य केले. त्यामुळे, शिवमला वेळीच उपचार मिळाले आणि अनर्थ टळला. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनीही त्याची दखल घेत लोहार, दाणे यांचा कार्यालयात बोलावून सत्कार केला.
हेही वाचा - VIDEO: दहिसर परिसरात डोक्यावर दगड पडल्याने व्यक्तीचा मृत्यू.. घटना सीसीटीव्हीत कैद