मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग काम करत आहे. आरोग्य विभागात डॉक्टर आणि नर्सची कमतरता भासू लागल्याने कंत्राटी पद्धतीने त्यांची नियुक्ती केली. त्यांच्यावर पालिकेने आठ महिन्यात तब्बल ९७ कोटी रुपये खर्च केले आहेत.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधान भेटीत मराठा समाजावर फोकस नाही; मराठा कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
कंत्राटी डॉक्टर, नर्स -
मुंबईमध्ये गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार सुरु होताच आरोग्य विभाग कामाला लागला. कोरोना रुग्णांवर उपचार करताना पालिकेची, खासगी रुग्णालये कमी पडू लागली. डॉक्टर नर्स कमी पडू लागले. त्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स नर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची कमतरता भासू लागली. त्यामुळे पालिकेने संपूर्ण यंत्रणा कंत्राटी पद्धतीने उभी केली. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी तसेच एमबीबीएस डॉक्टर ही कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले. याबाबतचा प्रस्ताव २९ ऑक्टोबरला सादर करण्यात आला होता. त्यात कशावर खर्च केला माहिती देण्यात आली नव्हती यामुळे तो प्रस्ताव पुन्हा माहितीसह सादर करण्यास सांगण्यात आला होता. त्यावर माहिती देताना ही माहिती देण्यात आली आहे.
असा झाला खर्च -
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत नियमित तत्वावर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची 22 पदे भरण्यात आली होती. त्यांच्या वेतनावर रु .1,14,61,520 / - एवढा आणि परिचारिका या संवर्गाची 315 पदे नियमित तत्वावर भरण्यात आली होती. त्यांच्या वेतनावर रु .13,91,82,530 / - एवढा आस्थापना खर्च झालेला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत विविध शाखेतील डॉक्टरांची ( एमबीबीएस / बीएएमएस बीएचएमएस / बीयुएमएस / बीडीएस / इतर ) 2776 पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात आली. त्यांच्या मानधनावर रु. 56,90,93,763 / - एवढा आणि परिचारिका ( जीएनएम / एएनएम | स्टुडंट्स ) या संवर्गाची 2451 पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात आली व त्यांच्या मानधनावर रु. 25,90,39,529 / - एवढा आस्थापना खर्च झाला आहे.
हेही वाचा - पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट राजकीय तडजोडीसाठी का?, उदयनराजेंचा सवाल