ETV Bharat / city

सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्क-नोंदणीतून राज्याच्या तिजोरीत 937 कोटी जमा - सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्क-नोंदणी

बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने 26 ऑगस्टला मुद्रांक शुल्क 2 ते 3 टक्क्यांनी कमी केले आहे. याचा चांगला फायदा बांधकाम व्यावसायाला होताना दिसत आहे. यामुळे घरांच्या विक्रीच्या संख्येत चांगली वाढ झाली आहे. मात्र मुद्रांक शुल्क कमी केल्यामुळे महसूलाची रक्कम मात्र घटली आहे.

Stamp duty-registration in September
सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्क-नोंदणी
author img

By

Published : Oct 1, 2020, 4:44 PM IST

मुंबई - कोरोना लॉकडाऊनमुळे मंदीची झळ सोसणाऱ्या बांधकाम व्यावसायाला उभारी देण्यासाठी राज्य सरकारने 26 ऑगस्टला मुद्रांक शुल्क 2 ते 3 टक्क्यांनी कमी केले आहे. याचा चांगला फायदा बांधकाम व्यावसायाला होताना दिसत आहे. कारण सप्टेंबरमध्ये दस्तनोंदणी वाढली असून घर विक्री व्यवहार वाढले आहेत. सप्टेंबरमध्ये 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदवले गेले आहेत. या वर्षातील ही सर्वाधिक दस्तनोंदणी असून यातून राज्याला 937 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ऑगस्टमध्ये 972 कोटींचा महसूल मिळाला होता तर 2 लाख 6 हजार 857 दस्त नोंदवले गेले होते. पण यावेळी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे ऑगस्टमध्ये 5 टक्क्यांनी मुद्रांक शुल्क वसुली झाली होती. तर सप्टेंबरमध्ये 2 ते 3 टक्क्यांनी वसुली झाली आहे. त्यामुळे दस्त वाढले आहेत पण महसूलाची रक्कम मात्र घटली आहे.

22 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू झाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग-धंदे, व्यवसाय, क्षेत्र बंद झाले. परिणामी महसूलाचे अनेक स्रोतही बंद झाले. यावेळी मुद्रांक शुल्क-नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. पण खरेदी-विक्री व्यवहाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. त्यामुळे एप्रिलमध्ये केवळ 1425 दस्त नोंदवले गेले आणि यातून राज्याला केवळ 3 कोटी 94 लाख इतका महसूल मिळाला होता. आजवरच्या इतिहासातील हा सर्वात कमी महसूल होता. जूनमध्ये मात्र मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाने ऑनलाइन बरोबरच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा सुरू केली. त्यानंतर मात्र महसूल हळूहळू वाढू लागल्याचे चित्र आहे. जूनमध्ये 1 लाख 74 हजार 394 दस्त नोंदवले गेले, तर यातून 819 कोटीचा महसूल राज्याला मिळाला. जुलै मध्ये 88 हजार 049 दस्त नोंदवले गेले तर यातून 933 कोटी तिजोरीत जमा झाले.

ऑगस्टमध्ये दस्त नोंदणीचा आकडा 2लाख 6 हजार 857 वर गेला तर यातून 972 कोटी मिळाले. पण ग्राहक आणि बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 26 ऑगस्टपासून मुद्रांक शुल्क दरात कपात केली. 31 डिसेंबर 2020पर्यंत काही ठिकाणी 2 ते 3 टक्क्यांनी शुल्क वसूल केले जात आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये विक्री मोठ्या संख्येने वाढली असून इतर व्यवहारही तेजीत आले आहेत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये तब्बल 2 लाख 76 हजार 108 दस्त नोंदवले गेले आहेत. यातून 937 कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम ऑगस्टमधील 972 कोटीच्या तुलनेत कमी वाटत असली तरी ही रक्कम 2 ते 3 टक्क्यांनी वसूल झाली आहे, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यावेळी सप्टेंबरमध्ये 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत हे विशेष. ऑगस्टमध्ये 82 हजार 12 घरे विकली गेली होती. आता मात्र विक्री वाढत असून ही समाधानकारक बाब आहे.

मुंबईतही दस्तनोंदणी वाढली

मुद्रांक शुल्क वसुलीचा मुंबईच्यादृष्टीने विचार करता मुंबईतही विक्री वाढल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये 211.76 कोटीचा महसूल मिळाला होता. तिथे आता यात वाढ होऊन हा आकडा 234 कोटीवर गेला आहे. म्हणजेच राज्याला मिळालेल्या 937 कोटी पैकी 234 कोटी हे एकट्या मुंबईतून मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे ऑगस्टमध्ये 2642 घरे विकली गेली होती. तिथे हा आकडा सप्टेंबरमध्ये दुपटीने वाढला आहे. सप्टेंबरमध्ये 5597 घरे विकली गेली असून 180 कोटी रुपये यातून मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.