मुंबई : भांडुप उपनगरामध्ये 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार Minor Girl Rape Bhandup झाल्याची घटना समोर आली आहे. गेली दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर सातत्याने आरोपी बलात्कार करत असल्याचे बाब समोर आले आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत POCSO Act 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 62 आणि 65 वयोगटातील 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वयाने साठी पार केलेले हे नराधम या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करीत होते. अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. 2 accused arrested Bhandup raped
वयाची उलटली साठी पण कृत्य जाणून हाणावी वाटते लाठी या अल्पवयीन मुलीवर आरोपी नराधामांकडून मुलीवर बलात्कार एकदाच झालेला नाही. आरोपींपैकी दोघे हे साठीच्या वयाचे नराधम आहेत. हे दोघेही या लहानग्या 9 वर्षांच्या मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींच्या वयाचा विचार केला तर या तीन आरोपींपैकी दोघांची वये ही साठी उलटलेली आहेत. तरीही हे आरोपी दोन वर्षे हे कृत्य करत होते.
मुलीचे संगोपन करीत असल्याचा दावा - या अल्पवयीन मुलीला एका समाजिक संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याने पाहिले आणि तिला अनाथालयात दाखल केले. त्यानंतर तिथे 62 आणि 65 वर्षांचे हे आरोपी पोहचले आणि त्यांनी या मुलीचे संगोपन करीत असल्याचा दावा केला आहे. मात्र या दोन्ही आरोपींची वागणूक संशयास्पद वाटल्याने तिथल्या अनाथालयातील अधिकाऱ्याने या लहान मुलीला विश्वासात घेऊन त्यांच्याबाबत विचारले. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीने तिच्यासोबत काय होते आहे हा सगळा प्रकार सांगितला. अवघ्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर हे नराधम लैंगिक अत्याचार करत असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले.
मुलीची आजी बाहेर गेली की व्हायले शोषण - मुलीने सांगितले की तिचे आई वडील एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईच्या एका नातेवाईक महिलेकडे राहत होती. मुलीच्या आजीकडे घर नव्हते. त्यावेळी आरोपींपैकी एकाने त्यांना मदत केली आणि त्यानंतर या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. या आरोपीने त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. आरोपी नेहमी तिथे येत असे. ज्यावेळी आजी बाहेर जाई त्यावेळी तो या मुलीचे शोषण करत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा झोक्याच्या दोरीने लागला गळफास; मामाच्या गावी आलेल्या चिमुकल्याचा मृत्यू