ETV Bharat / city

मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या, गुन्हे शाखेतील तब्बल ६५ जणांचा समावेश

वाझे यांच्या निकटवर्तीयांचीही बदली करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रियाज उद्दिन काजी या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे. या अधिकाऱ्याला गुन्हे शाखा इथून सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सुनिल बळवंत माने या अधिकाऱ्याची सुद्धा एटीएस कडून चौकशी झाली असून त्यांना गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.

हेमंत नगराळे
हेमंत नगराळे
author img

By

Published : Mar 24, 2021, 7:48 AM IST

Updated : Mar 24, 2021, 2:59 PM IST

मुंबई- सचिन वाझेला झालेली अटक, त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांची झालेली उचलबांगडी, त्यानंतरचा लेटरबॉम्ब या सर्व पार्श्वभूमिवर मंगळवारी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलात एकाच दिवशी तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ६५ अधिकारी हे क्राईम ब्रँचचे आहेत.

65 गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची बदली
एकूण ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात तब्बल ६५ बदल्या या क्राइम ब्रँचमधील अधिकाऱ्यांच्या आहेत. त्यात पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस खात्याचे पोलीस सहआयुक्त प्रशासन राजकुमार व्हटकर यांनी या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळी पोलीस ठाणे, सशस्त्र पोलीस दल, विशेष शाखा, वाहतूक, संरक्षण व सुरक्षा सारख्या विभागात या बदल्या झाल्या आहेत.

mumbai police
बदल्या झालेले अधिकारी

वाझेंच्या निकटवर्तींयांचीही बदली

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून रियाज उद्दिन काजी या सहाय्यक पोलिस निरीक्षकाची चौकशी करण्यात येत आहे. या अधिकाऱ्याला गुन्हे शाखा इथून सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. त्याबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी सुनिल बळवंत माने या अधिकाऱ्याची सुद्धा एटीएस कडून चौकशी झाली असून त्यांना गुन्हे शाखेतून मुलुंड पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.

mumbai police
बदल्या झालेले अधिकारी

फडणवीसांचे आरोप

राज्य पोलीस दलातील बदल्यांसंदर्भातील आरोपांविषयीचे त्यांच्याकडे असलेले दस्तावेज यावेळी त्यांनी गृह सचिवांना दिले. या दस्तावेजांनुसार योग्य कारवाईचे आश्वासन गृह सचिवांनी दिल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळख असलेल्या मुंबई पोलिसांची प्रतिमा अलिकडील काळात समोर आलेल्या प्रकरणांमुळे नक्कीच खराब झाली आहे. या संक्रमणातून पोलीस दलाला बाहेर काढावे लागेल असे फडणवीस म्हणाले. यावेळी तत्कालीन डीआयजींनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांना याविषयी ब्रीफ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती माझ्याकडे आहे. मात्र, यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. कुणाला वाचविण्याचा प्रयत्न या प्रकरणी झाला आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा - पोलीस अधिकारी बदली प्रकरण : मुख्यमंत्र्यांना अहवाल देऊनही कारवाई का झाली नाही?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

हेही वाचा - 'महाराष्ट्रात उघड्यांना नागडे म्हणायचे व गुजरात, उत्तर प्रदेशमधील नागड्यांकडे डोळेझाक करायची'

Last Updated : Mar 24, 2021, 2:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.