ETV Bharat / city

मालमत्ता कर वसुलीत वरळीत १०० तर मुंबईत ८०० कोटींचा घोटाळा; काँग्रेसची चौकशीची मागणी - scam in property tax collection

मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका अधिकाऱ्यांनी वारली येथील अनेक मालमत्ता कमी मापाच्या दाखवून १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघड केला आहे.

bmc
मुंबई पालिका
author img

By

Published : Mar 23, 2021, 8:09 PM IST

Updated : Mar 23, 2021, 8:21 PM IST

मुंबई - गृहमंत्र्यांनी बारवाल्यांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करा असे सांगितल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील राजकारण तापले असताना मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी पालिका अधिकाऱ्यांनी वारली येथील अनेक मालमत्ता कमी मापाच्या दाखवून १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार उघड केला आहे. याच प्रकारे मुंबईत ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची चौकशी पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

माहिती देताना रवी राजा

हेही वाचा - परभणी जिल्हा बँक निवडणूक; स्वतंत्र निवडून आलेल्या 2 संचालकांच्या हातात सत्तेच्या चाव्या

कमी कर वसुली -

वरळी येथील जी दक्षिण विभागात वरळी परेल हे विभाग येतात. परेल येथील डॉ. आंबेडकर रोड, शिवसागर इस्टेट, सी जय रेसिडेंसी येथील शहा हाऊस ही मालमत्ता आहे. तिचे मालक 'प्राईम रियालिटी' हे आहेत. या मालमत्तेचे क्षेत्रफळ १२,४२२.०२ चौरस मिटर आहे. या मालमत्तेचे अंदाजे मूल्य २५० कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. मात्र पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागतील अधिकाऱ्यांनी मालकाशी संगनमत करून या मालमत्तेचे क्षेत्रफळ फक्त १,९१२ चौरस मिटर इतके दाखवून त्याचे अंदाजे मूल्य २३ कोटी ४८ लाख २० हजार ८७० रुपये दाखवले आहे. त्यांच्याकडून फक्त १४ लाख ८८ हजार ७६४ रुपये इतकाच मालमत्ता कर आकारले आहेत. त्यामुळे मुळात २५० कोटी रुपयांच्या मालमत्तेला काही कोटींचा मालमत्ता कर आकारणे अपेक्षित असताना फक्त काही लाख रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे.

७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा -

जी दक्षिण विभागात मालमत्ता कर वसुलीत तब्बल १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. मुंबईत अशा प्रकारे मालमत्ता कर वसुलीमध्ये किमान ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे पालिकेचे मालमत्ता कर वसुलीत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे. याप्रकरणी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून चौकशी व कारवाईची मागणी करणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

हेही वाचा - ठाकरे सरकारकडून 600 कोटी रुपयांचा एसआरए घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप

Last Updated : Mar 23, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.