ETV Bharat / city

लैंगिक अत्याचार प्रकरणी 80 वर्षाच्या वृद्ध दाम्पत्याला कोर्टाने सुनावली १० वर्षांची शिक्षा - तुरुगंवासाची शिक्षा बातमी

मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 4 वर्षांच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष कोर्टाने दोषी ठरवले. त्यांना 10 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

representative image
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 12, 2021, 3:00 PM IST

मुंबई - मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 4 वर्षांच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल विशेष कोर्टाने दोषी ठरवले. त्यांना 10 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. हा खटला 2013 सालाचा आहे. लैंगिक गुन्हेगारांपासून संरक्षण कायद्याचा संदर्भ देत (पोक्सो) न्यायाधीश रेखा एन पंढरे यांनी असे म्हटले आहे की, कथित आजी-आजोबांनी मुलीची काळजी घेणे अपेक्षित होते. पण नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : सचिन वझेंची नियंत्रण कक्षात बदली

काय आहे प्रकरण?

पोलिसांना दिलेल्या निवेदनात मुलीने म्हटले होते की, 4 सप्टेंबर 2013 रोजी शाळेतून परत आल्यानंतर तिने जेवण केले. नंतर टीव्हीवर कार्यक्रम पाहात होती. दुपारच्या सुमारास, ती एका मित्राबरोबर खेळायला तिच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेली. तिचा मित्र झोपला होता तेव्हा ती घरी परतली. तेव्हा तिला आरोपी दाम्पत्याला घरी बोलावले .

मुलीने सांगितले की, जेव्हा ती त्या आजोबांकडे गेली तेव्हा त्याने तिला घरात नेले आणि तिच्याशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला, पण तिने सोडवण्याचा प्रयत्न करताच त्याने तिला चापट मारली.

मुलगी म्हणाली की, जेव्हा तिने पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या व्यक्तीने तिच्या चेहऱ्यावर थुंकले आणि लहान मुलगी घाबरली. पण नंतर ती कपडे सावरत आपल्या घराकडे धाव घेण्यास यशस्वी झाली.

हेही वाचा - लबाड सरकारची बेबंदशाही; एमपीएससी प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचा निशाणा

त्या दिवशी घरी परतल्यानंतर मुलीने आपल्या आईला सांगितले की, जर ती रागावणार नाही तर तिला काहीतरी सांगायचे आहे. आईने तिला आश्वासन दिल्यावर मुलीने सर्व घटना सांगितली. आईने तातडीने मुलीच्या गुप्तांगाची तपासणी केली तेव्हा गुप्तांगला इजा झाल्याचे लक्षात आले. आईने तातडीने मुलीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली आणि त्वरित पोलीस तक्रार दाखल केली. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याला दुसर्‍या दिवशी अटक करण्यात आली.

हेही वाचा - मला वनमंत्री करा..! हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.