मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या ( Mumbai Corona Update ) संख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली होती. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन गेले काही दिवस १००च्या खाली रुग्ण आढळून येत आहेत. आज ८० रुग्ण आढळून ( mumbai covid 19 new patient ) आले असून सलग सातव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ६५० सक्रिय रुग्ण आहेत.
८० नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत आज (३ मार्च) ८० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ११८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३६ हजार ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६५० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५४४१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.
९८.१ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ८० रुग्णांपैकी ६९ म्हणजेच ८६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ११ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५,८२१ बेडस असून त्यापैकी ६६९ बेडवर म्हणजेच १.९ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९८.१ टक्के बेड रिक्त आहेत.
असे झाले रुग्ण कमी -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८० रुग्णांची नोंद झाली आहे.
२१ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.