ETV Bharat / city

Winter Session 2021 : अधिवेशन प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाचणीत 8 जण कोरोना बाधित

बुधवारी २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन ( Winter Session 2021 ) प्रवेशासाठी खबरदारी म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदारांची आरटी पीसीआर चाचणी ( Journalist, Officer And MLA RT-PCR Teste ) करण्यात आली. यात 8 जणांनाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ही आली आहे.

विधान भवन मुंबई संग्रहित फोटो
विधान भवन मुंबई संग्रहित फोटो
author img

By

Published : Dec 21, 2021, 5:01 PM IST

Updated : Dec 21, 2021, 5:49 PM IST

मुंबई - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session 2021 ) पार्श्वभूमीवर विधानभवनात ( Vidhan Bhavan ) प्रवेश देण्यासाठी घेण्यात आलेल्या आरटी-पीसीआर चाचणीत ८ जणांची चाचणी पॉझिटिव्ही ( 8 People Tested Positive for RT-PCR ) आली आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस आणि त्याचबरोबर आरटी-पीसीआर चाचणी विधान भवन प्रवेशासाठी ( Vidhan Bhavan Entrance ) बंधनकारक करण्यात आली असून अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बुधवारी २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन ( Winter Session 2021 ) प्रवेशासाठी खबरदारी म्हणून पत्रकार, अधिकारी आणि आमदारांची आरटी पीसीआर चाचणी ( Journalist, Officer And MLA RT-PCR Teste ) करण्यात आली. एकूण २६७८ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.

  • 'ओमायक्रॉनचा धोका पाहता उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा'

अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह या उपाययोजनांचा उच्चस्तरीय बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी दिल्या आहेत.

  • अभ्यागतांना प्रवेश नाही

अधिवेशन कालावधीत गर्दी होऊन संसर्ग वाढू नये, यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. स्वीय सहायकांसाठी बसण्याची व्यवस्था विधान भवनासमोरील वाहनतळ आवारात स्वतंत्र मंडप टाकून करण्यात आली आहे. तर मंत्रीसाठी आस्थानपनेवरील कर्मचारी यांना देखील अत्यंत मर्यादित संख्येने प्रवेश देण्यात येणार असल्याचे सभापतींनी सांगितले.

  • सभागृहांमध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा

विधानसभा सभागृहामध्ये सुयोग्य अंतर राखण्याच्या दृष्टीने अधिवेशन कालावधीमध्ये सन्माननीय सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था एक आसन सोडून करण्यात आली आहे. गतवर्षीप्रमाणेच सभागृहाच्या गॅलरीमध्ये देखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानपरिषद सभागृहामध्ये आसन व्यवस्था पुरेशी असल्यामुळे सदस्यांची बसण्याची व्यवस्था सभागृहामध्येच करण्यात आली आहे. विधानसभा, विधानपरिषद व मध्यवर्ती सभागृहामध्ये निगेटिव्ह प्रेशर यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

हेही वाचा - Winter Session 2021 : विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री उपस्थित राहणार

Last Updated : Dec 21, 2021, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.