मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. सोमवारी 2 हजार 026 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काल मंगळवारी त्यात किंचित वाढ होऊन 2 हजार 401 नव्या रुग्णांची नोंद झाली. आज (बुधवारी) 6 ऑक्टोबरला 2 हजार 876 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूसंख्येतही वाढ होऊन 90 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 2 हजार 763 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
33,181 सक्रिय रुग्ण -
आज (बुधवारी) राज्यात 2876 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 67 हजार 791 वर पोहचला आहे. तर आज 90 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 362 वर पोहचला आहे. आज 2 हजार 763 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 91 हजार 662 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 96 लाख 19 हजार 637 नमुन्यांपैकी 65 लाख 67 हजार 791 नमुने म्हणजेच 11.02 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 39 हजार 760 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 181 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2583, 21 सप्टेंबरला 3131, 22 सप्टेंबरला 3608, 23 सप्टेंबरला 3286, 24 सप्टेंबरला 3276, 26 सप्टेंबरला 3292, 27 सप्टेंबरला 2432, 28 सप्टेंबरला 2844, 29 सप्टेंबरला 3187, 30 सप्टेंबरला 3063, 1 ऑक्टोबरला 3105, 2 ऑक्टोबरला 2696, 3 ऑक्टोबरला 2692, 4 ऑक्टोबरला 2026, 5 ऑक्टोबरला 2401, 6 ऑक्टोबरला 2876 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58, 26 सप्टेंबरला 36, 27 सप्टेंबरला 32, 28 सप्टेंबरला 60, 29 सप्टेंबरला 49, 30 सप्टेंबरला 56, 1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
'या' विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 624
अहमदनगर - 373
पुणे - 327
पुणे पालिका - 192
पिंपरी चिंचवड पालिका - 115
सोलापूर - 96
सातारा - 215
हेही वाचा - #नवरात्रोत्सव2021 : 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा', पाहा फक्त 'ईटीव्ही भारत'वर