ETV Bharat / city

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - सात जानेवारी मराठी टॉप न्यूज. ई टीव्ही भारत मराठी टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Top News
आजच्या टॉप न्यूज
author img

By

Published : Jan 7, 2022, 7:00 AM IST

आज दिवसभरात -

  • आज कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल

कोल्हापूर - आज जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आहे. सकाळी 11 पर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.

  • आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई - भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजप नेते नितेश राणे हे संशयित आरोपी आहेत. मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

  • अनिल देशमुख यांच्या जामीनावर आज सुनावणी

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख हे सध्या ईडी कोठडीत आहे. जामीनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

  • 'म्हाडा'ची ऑनलाइन लॉटरी आज

पुणे - गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून (म्हाडा) पुणे आणि पिपरी-चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूरमधील चार हजार २२२ सदनिकांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी ६५ हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. सात जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे.

  • मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

मुंबई - हवामान विभागाने आज (7 जानेवारी) मध्य महाराष्ट्रातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

काल दिवसभरात -

मुंबई - एसटी संपाबाबतीत (ST Strike) खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) लक्ष घालत आहेत. शरद पवार मैदानात म्हणजे आपली हत्या होऊन आपला दत्ता सामंत (Datta Samant) होऊ शकतो, असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केले आहे. तसेच त्यांनी याबाबत भीतीही व्यक्त केली आहे. गुरुवारी (6 जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर टीका केली.

मुंबई - राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ होताना दिसत ( Covid Outbreak In Maharashtra ) आहे. आज दिवसभरात 36 हजार 365 बाधितांची नोंद ( 36000 New Covid Cases In Maharashtra ) झाली. त्यापैकी मुंबईत सुमारे 20 हजार रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाला आहे. आज एकूण 13 रुग्ण दगावले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे 79 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचे आठ हजार 907 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.

परभणी - जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Parbhani) होत आहे. त्यातच गुरुवारी (6 जानेवारी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (Vasantrao Naik Marathwada Agricultural University) परिसरातील जवाहर नवोदय विद्यालयातील 5 शिक्षक कोरोनाबाधित (Jawahar Navodaya Vidyalaya) आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा हा संसर्ग शाळेच्या माध्यमातून पसरू नये म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा ग्रामीण व शहरी भागातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद (Schools Closed in Parbhani) ठेवण्याचे लेखी आदेश काढले आहेत.

नवी दिल्ली - वादग्रस्त बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) प्रकरणातील मुख्य आरोपी नीरज बिष्णोईला सात दिवसांची पोलीस कोठडी (Neeraj Bishnoi send Police Custody) न्यायालयाने सुनावली आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारं आणि वादग्रस्त बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरजला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ या स्पेशल सेलनं आसाममधून अटक ( Bulli Bai app case Main conspirator arrested ) केली आहे.

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील (Johannesburg Wanderers Stadium) दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs South Africa 2nd Test) शानदार विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला, त्यांचा कर्णधार डीन एल्गर. त्याने नाबाद (96) धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. पण चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली व भारतीय गोलंदाजांना दाद दिली नाही.

  • आजचे राशीभविष्य -
  1. VIDEO : 07 January Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्
  2. 07 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज नवीन कामात यश मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.