मुंबई - विलेपार्ले जुहू रोड इंदिरा नगर येथील नाल्यावर असलेल्या ३० ते ४० झोपड्या धोकादायक होऊन पडायला आल्या आहेत. त्यापैकी ७ झोपड्यांचा काही भाग नाल्यात ( 7 huts parts collapsed in vile parle area ) कोसळला आहे. तर २४ झोपड्या खाली करण्यात आल्या आहेत. या झोपड्यांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली ( Mumbai Emergency department ) आहे.
७ झोपड्यांचा काही भाग कोसळला - विलेपार्ले जुहू रोड मिठीबाई कॉलेज येथे नाल्याला लागून इंदिरा नगर १ ही झोपडपट्टी ( Indira nagar slum area issue ) आहे. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाल्यावर असलेल्या ३० ते ४० झोपड्या धोकादायक होऊन पडायला आल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीस कंट्रोल रूमला याची माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी अग्निशमन दल आणि पालिकेला याची माहिती देताच घटनास्थळी पालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले. घटनास्थळी ७ झोपड्यांचा काही भाग नाल्याता पडल्याचे निदर्शनास आले. तर धोकादायक झालेल्या २४ झोपड्या खाली करण्यात आल्या आहेत. यामधील रहिवाशांना सन्यास आश्रम पालिका शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची सोय करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.