ETV Bharat / city

मुंबईची तुंबई - एका पंपामधून सेकंदाला उपसले जाते ६ हजार ६०० लिटर पाणी

author img

By

Published : Jul 6, 2021, 10:49 AM IST

मुंबईत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया, गझदरबंध हे ६ पम्पिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. त्यात प्रत्येकी सहा ते दहा पंप आहेत. एक पंपामधून दर सेकंदाला ६ हजार ६०० लिटर पाण्याचा उपसा केला जातो. ६ पम्पिंग स्टेशनमध्ये एकूण ४३ पंप आहेत.

मुंबईची तुंबई
मुंबईची तुंबई

मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून राहते. हे पाणी उपसून समुद्रात सोडले जाते. यासाठी पालिकेने ६ पंपिंग स्टेशन उभारले आहेत. या पंपिंग स्टेशनमधील एक पंपद्वारे एका सेकंदात ६ हजार ६०० लिटर पाणी उपसून समुद्रात सोडले जाते. मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास एका तलावाइतके पाणी या पंपामधून उपसले जाते.

६ हजार ६०० लिटर पाणी
६ हजार ६०० लिटर पाणी

असे चालते पंपिंग स्टेशनचे काम
मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. या पावसादरम्यान १०० मिलिमीटर पावसापेक्षा मोठा पाऊस पडल्यास मुंबईत सखल भागात पाणी साचते. मुंबईत अनेकवेळा दोन ते तीन तासात २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडतो. यामुळे हिंदमाता, किंग सर्कल, सायन, अंधेरी सबवे, नॅशनल कॉलेज बांद्रा, भायखळा, परेल, आदी सखल भागात पाणी साचते. मुंबईत पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या उभारण्यात आल्या होत्या. त्याची क्षमता २५ मिलिमीटर पेक्षा कमी होती. महापालिकेने या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवून ५० मिलिमीटर इतकी केली आहे. या पर्जन्य जलवाहिन्यामधून पाणी महापालिकेने उभारलेल्या पंपिंग स्टेशनमध्ये नेले जाते. महापालिकेने आतापर्यंत सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत. प्रत्येक पंपिंग स्टेशनमध्ये सहा ते दहा पंप असून त्यामधील एक पंपामधून एका सेकंदाला ६ हजार ६०० लिटर पाणी उपसून समुद्रात सोडले जाते.

या पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण

pumping station
pumping station
तलावा इतके पाणी उपसले जाते दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस पडून मुंबईची तुंबई होते. त्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाठी सखल भागात असलेल्या पंपामधून पाणी उपसून पर्जन्य जलवाहिन्यामार्गे ते पंपिंग स्टेशनला आणले जाते. तेथून ते समुद्रात सोडले जाते. मुंबईत सतत दोन ते तीन पाऊस पडला आणि मुंबईची तुंबई झाली तर एका वेळेला मुंबईला पुरवठा करणाऱ्या तुळशी तलावामधील पाणीसाठ्या इतके म्हणजेच तब्बल ८ हजार दशलक्ष लिटर इतके पाणी उपसले जाते. मोगरा पंपिंग स्टेशन उभारणार मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशनच्या बांधकामासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच हे काम मार्गी लागणार आहे. या पंपिंग स्टेशनमुळे अंधेरी ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशन परिसर, मालपा डोंगरी ते वर्सोवा परिसरात होणाऱ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. पंपिंग स्टेशनची उभारणी व पुढील सात वर्षांची देखभाल यासाठी ३३०.१२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच हे काम २० महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल. कार्यान्वित झालेले पम्पिंग स्टेशन आणि त्यासाठी आलेला खर्च
  • हाजी अली पम्पिंग स्टेशन - १०० कोटी
  • इर्ला पम्पिंग स्टेशन - ९० कोटी
  • लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन - १०२ कोटी
  • क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशन - ११६ कोटी
  • ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन - १२० कोटी
  • गझदर पंपिंग स्टेशन - १२५ कोटी

हेही वाचा - परमबिर सिंग यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस उपअधीक्षकांनी केले गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.