ETV Bharat / city

चिंताजनक! राज्यात 64 पोलीस अधिकारी-कर्मचारी कोरोना 'पॉझिटिव्ह' - maharashtra police

कोरोना विषाणुच्या संक्रमणाचा फटका पोलीस खात्याला बसला असून तब्बल 12 अधिकारी व 52 कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 मार्च ते 22 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 62 हजार 987 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

crime during lockdown
चिंताजनक! राज्यात 64 पोलीस अधिकारी 'पॉझिटिव्ह'
author img

By

Published : Apr 22, 2020, 4:43 PM IST

मुंबई - कोरोना विषाणुच्या संक्रमणाचा फटका पोलीस खात्याला बसला असून तब्बल 12 अधिकारी व 52 कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 मार्च ते 22 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 62 हजार 987 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 595 जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आलीय. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 134 घटना घडल्या असून यामध्ये 477 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले. संचारबंदीच्या काळात 74 हजार 616 फोन कॉल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या(१००) क्रमांकावर आले आहे. अनधिकृत वाहतुकीचे 1 हजार 67 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 13 हजार 869 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 44 हजार 135 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 2 कोटी 41 लाख 76 हजारांचा दंड ठोठावला आहे.

राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 9 हजार 826 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड 5509, नागपूर शहर 3535, नाशिक शहर 3325, सोलापूर 3821, गुन्हे नोंदवण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे रत्नागिरी (57) व अकोल्यात (58) दाखल झाले आहेत.

व्हिसा संदर्भात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 156 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये मुंबईत 32, अहमदनगर 29, अमरावती 18, पुणे 8, नागपूर शहर 8, ठाणे 21, चंद्रपूर 11, गडचिरोली 9, नवी मुंबई 10, तर नांदेडमध्ये 10 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.