ETV Bharat / city

Municipal Corporation Election : ६० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ३ टप्प्यात होणार प्रशिक्षण - पालिका निवडणूकीसाठी ६० हजार कर्मचारी

यंदा त्यात १५ हजाराने वाढ होऊन ६० हजार कर्मचारी अधिकारी निवडणुकीच्या कामासाठी तैनात केले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार असून गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना या कामातून वगळण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Nov 16, 2021, 5:24 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होत आहे. कोरोनाचा प्रसार, वाढलेली वॉर्डची संख्या यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे. मागील निवडणुकीत ४० हजार कर्मचारी नियुक्त केले होते. यंदा त्यात १५ हजाराने वाढ होऊन ६० हजार कर्मचारी अधिकारी (Staff appointed) निवडणुकीच्या कामासाठी तैनात केले जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार असून गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना या कामातून वगळण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

११ हजार बूथ

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका कामाला लागली आहे. प्राथमिक तयारी, आदी नियोजन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. राज्य सरकारने पालिकेचे ९ प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्याच्या २२७ प्रभागांची संख्या २३६ होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २०२२ च्या पालिका निवडणुकीत बूथची संख्या ८,५०० वरुन ११,००० पर्यंत नेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. १२ प्रभागासाठी दोन निवडणूक अधिकारी नेमले जातील. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल. दरम्यान गर्भवती महिलांना निवडणूक कामातून वगळण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

तीन टप्प्यात प्रशिक्षण

पालिकेकडून निवडणुकीसाठी नेमलेल्या ६० हजार कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात प्राथमिक प्रशिक्षण, दुसऱ्या टप्प्यात विस्तृत प्रशिक्षण आणि त्यानंतर ईव्हीएम यंत्राची हाताळणी आदींचा समावेश असेल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

आदेशाची प्रतीक्षा

राज्य सरकारकडून नगरसेवकांच्या वाढीव संख्येविषयी अद्याप पालिकेला आदेश प्राप्त झालेले नाहीत. मुंबईत नवीन प्रभागांचे सीमांकन होणार आहे. पालिकेकडून पुन्हा सर्व प्रभागांच्या सीमा लोकसंख्येनुसार निश्चित केल्या जातील. याबाबत निर्देश आल्यानंतर हे काम हाती घेतले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे त्यानंतर कच्चा अहवाल सादर केला जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - maharashtra winter session 2021 हिवाळी अधिवेशन पुढे ढकलले जाणार..! जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.