मुंबई - कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबई शहर व उपनगरातील चित्र आता बदलले आहे. मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज नव्या 574 रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 255 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
9 हजार 956 अॅक्टिव्ह रुग्ण -
मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 574 नवे रुग्ण आढळून आले असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 10 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 69 हजार 704 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 570 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 586 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 44 हजार 659 वर गेला आहे. सध्या मुंबईत 10 हजार 077 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 255 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 255, दिवस तर सरासरी दर 0.29 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 467 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 707 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 85 हजार 287 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण