मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून ती नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहली आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील प्रवासी लाखोंच्या संख्येने ट्रेन आणि बसने प्रवास करतात. बेस्टने ३० लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या सुमारे ५० टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत BEST Buses CCTV Cameras Issue. बेस्टच्या बसमध्ये याआधी दोन वेळा बॉम्ब ब्लास्ट BEST Bus blast झाले आहेत. त्यानंतरही बेस्टने प्रवाशांच्या सुरक्षेवर म्हणावे तसे लक्ष दिले नसल्याने लाखो प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह safety of BEST Bus passengers निर्माण झाला आहे.
सुमारे ५० टक्के बसमध्ये सीसीटीव्ही नाहीत -
मुंबईत ७५ लाख प्रवासी ट्रेनमधून तर ३० लाख प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करतात. रेल्वेमध्ये बहुसंख्य स्थानकांवर मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत. प्रत्येक स्थानकावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितावर कारवाई करणे शक्य होते. बेस्टच्या स्वतःच्या सुमारे १३०० बसेस आहेत त्यामधील १ हजार बसमध्ये सीसीटीव्ही नाहीत. बेस्टने प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी खासगी कंत्रादाराकडून एसी बसेस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. बेस्टच्या कंत्राटी पद्धतीच्या १४०० बसेस आहेत त्यामधील १ हजार बसेसमध्ये सीसीटीव्ही आहेत तर ४०० बसेसमध्ये सीसीटीव्ही नाहीत. बेस्टने छोट्या रस्त्यावर बस चालवण्यासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या बसमध्येही सीसीटीव्ही नसल्याने लाखो प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही हवेच -
आता ज्या बस देण्यात आल्या आहेत या खासगी कंत्राटदाराकडून देण्यात आल्या आहेत. त्यांना घातलेल्या अटी शर्तीमध्ये सीसीटीव्ही लावून घेतला पाहिजे अशी अट आहे. परंतू प्रशासन त्यांच्याकडून सक्तीने करून घेत नाही. सगळीकडे व्हीआयकल ट्रेकिंग सिस्टम आहे. यामुळे बस कुठे धावत आहेत हे कंट्रोल रूम मध्ये बसून कळत आहे. मात्र बसच्या आत काय घडतं आहे हे मात्र कळत नाही. बस एसी असल्याने दरवाजे खिडक्या बंद असतात. धक्काबुक्की, वस्तू विसरून जाणे, पाकीटमारी, मारामारी सारखे प्रसंग घडतात. असे प्रकार घडल्यास प्रवाशांना सुरक्षितता मिळते त्याचसोबत तपास यंत्रणांना मदत होते. बेस्ट सार्वजनिक परिवहन सेवा असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही असायला पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपाचे माजी बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी दिली आहे.
म्हणून सीसीटीव्ही काढले -बेस्टमध्ये कंत्राटदाराने सीसीटीव्ही लावले होते. मात्र त्यानंतर त्याचे परिरक्षण कंत्राटदाराकडून केले जात नव्हते. त्यामुळे बसमधील सीसीटीव्ही काढण्यात आले. यामुळे बसमध्ये सीसीटीव्ही नसल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बेस्टमधील बॉम्ब स्फोट - - २ डिसेंबर २००२ मध्ये बेस्ट घाटकोपर येथे बसच्या खाली बॉम्ब लावण्यात आला होता. घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच हा स्फोट घडल्याने यात दोन जणांचा मृत्यू झाला तर ५० जण जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अंधेरी येथील SEEPZ औद्योगिक परिसरात दुसऱ्या बेस्ट बसमधून स्फोट न झालेला बॉम्ब निकामी केला होता. २८ जुलै २००३ रोजी बेस्ट बसच्या सीटखाली बॉम्ब ठेवण्यात आला होता. घाटकोपरमधील लाल बहादूर शास्त्री मार्गावर बसमध्ये स्फोट झाला. बॉम्ब बसच्या मागील बाजूस ठेवण्यात आला होता आणि त्यात ४ लोक ठार आणि ३२ जण जखमी झाले होते.
बॉम्बची अफवा - ९ डिसेंबर २०२१ रोजी एनसीपीए जवळ बेस्ट बस मध्ये एक संशयास्पद बॅग असल्याचे दिसून आले. हा प्रकार घडल्याने याची माहिती पोलिसांना दिली गेली. बॉम्ब शोध आणि नाशक पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथे संशायस्पद बॅगची पहाणी केली. बॅगमध्ये कारपेंटरचे सामान असल्याचे दिसून आले.