मुंबई - डीएचएफएल बँक तसेच येस बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींची मालमत्ता आज ईडीने जप्त केली आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले ( Avinash Bhosle property seized by ED ) तसेच मुंबईतील व्यावसायिक संजय छाबरिया ( Sanjay Chhabria property seized by ED ) यांची 415 कोटी रुपयाची मालमत्ता आज ईडीने जप्त ( ED seized assets worth 415 crores ) केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात यापूर्वीच अविनाश भोसले यांना ईडीने अटक केली होती. सध्या अविनाश भोसले, संजय छाब्रिया न्यायालयीन कोठडीत आहे. दोन दिवसाआधी सीबीआयने अविनाश भोसले यांना सर्वात मोठा दणका देत त्यांचे हेलिकॉप्टरही जप्त केलं आहे.
मालमत्ता जप्त - ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अविनाश भोसलेंची 164 कोटी तर, संजय छाब्रिया यांची 251 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या दोन्हीही आरोपींची एकूण मालमत्ता 415 कोटी रुपये इतकी होत आहे. ईडीने यापूर्वी देखील अविनाश भोसले यांच्या पुणे, मुंबईतील अनेक मालमत्ता जप्त केलेले आहे. अविनाश भोसले यांचा मुंबईतील ड्यप्लेक्स फ्लॅट जप्त केला गेला आहे. छाब्रिया यांची बंगळुरू, सांताक्रुझमधील मुंबईमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत 1 हजार 827 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
हेही वाचा - Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरेंचा बंडखोर आमदारांना इशारा; 'शांत बसाव अन्यथा शिवसैनिक...'
रक्कम इतरत्र वळवण्यात आली - संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपने डीएचएफएलकडून घेतलेल्या दोन हजार कोटी रूपयांच्या कर्जातील 292 कोटी 50 लाख रुपये भोसले यांच्यामार्फत इतरत्र वळवण्यात आले. दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप आहे. वरळीतील एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही भोसले यांना सल्ला शुल्क रक्कम मिळाली. प्रकल्पाचा संभाव्य खर्च, वास्तुविशारद, अभियांत्रिकी आराखडा, प्रकल्प बांधकाम करार, वित्तीय मूल्यांकन संरचना, आदी गोष्टींबाबत भोसले यांच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. पण, भोसले यांच्या कंपन्यांकडून अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नसल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले.
मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्यानं दाखल - भोसले यांनी हजारो कोटींचा घोटाळा करून त्या पैशातून परदेशांत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप सीबाआयनं केला आहे. तर, डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ईडीनं नुकतीच मुंबई, पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी याबाबत छापेमारी केली. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट, ईओडब्ल्यूने छाब्रिया, त्यांच्या कुटुंबियांवर 2020 मध्ये नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्यानं दाखल करण्यात आला आहे.