ETV Bharat / city

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाची ४१० दहा मिनिटे वाया; २ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार ( Maharashtra budget session ) पडले आहे. ३ मार्च ते २५ मार्च २०२२ या कालावधीत मुंबईत पार पडलेल्या या अधिवेशनात फार अडथळे न येता कामकाज बऱ्यापैकी झाले. मात्र तरीही या अधिवेशनात वाया गेलेल्या कामकाजाच्या तासात मुळे सुमारे २ कोटी ८८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ( 2 crore 88 lakh rupees wasted ) अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी ( senior political analyst Vivek Bhavsar ) व्यक्त केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन
अर्थसंकल्पीय अधिवेशन
author img

By

Published : Mar 26, 2022, 3:45 PM IST

Updated : Mar 26, 2022, 5:42 PM IST

मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Maharashtra Assembly session 2022 ) नुकतेच पार पडले. राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या अधिवेशनात घेण्यात आले आहेत. असे असले तरी वाया गेलेल्या कामकाजामुळे २ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार ( Maharashtra budget session ) पडले आहे. ३ मार्च ते २५ मार्च २०२२ या कालावधीत मुंबईत पार पडलेल्या या अधिवेशनात फार अडथळे न येता कामकाज बऱ्यापैकी झाले. मात्र तरीही या अधिवेशनात वाया गेलेल्या कामकाजाच्या तासात मुळे सुमारे २ कोटी ८८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ( 2 crore 88 lakh rupees wasted ) अंदाज ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी ( senior political analyst Vivek Bhavsar ) व्यक्त केला आहे.

हेही वाचा-Free Ration For Three Months : मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय.. १५ कोटी लोकांना ३ महिने मोफत रेशन

विधीमंडळात ४१० दहा मिनिटे वाया
अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते २५ मार्च दरम्यान झाले. मात्र, या अधिवेशनात विधानसभेत एकूण झालेल्या बैठकीची संख्या पंधरा आहे. प्रत्यक्षात कामकाज १०६ तास ३० मिनिटे इतके झाले. रोजचे सरासरी काम सात तास दहा मिनिटे इतके झाले. सभागृह कधीकधी रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवून कामकाज करण्यात आले. कधी सकाळी नऊ वाजता कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, असे असले तरी विरोधकांनी कामकाजात घातलेला गोंधळ आणि अन्य कारणांमुळे सभागृहाचा वेळ ६ तास ५० मिनिटे इतका वाया गेला. अधिवेशनाच्या कामकाजाचा दरम्यान येणारा खर्च पाहता प्रत्येक मिनिटाचा खर्च हा ७० हजार रुपये इतका असतो. एकूण कामकाजाची ४१० दहा मिनिटे वाया गेली. त्यानुसार राज्यातील जनतेच्या २ कोटी ८८ लाख रुपयांचा चुराडा झाला हे नक्की, असेही भावसार यांनी सांगितले.

हेही वाचा-MPSC Result : सुंदरी एस.बी बनली महाराष्ट्रातील पहिली अनाथ पोलीस उपनिरीक्षक

आमदारांची सभागृहातील उपस्थिती
विधानसभेत आमदारांची उपस्थिती सर्वात जास्त ९१.५३ टक्के इतकी होती. कमीत कमी उपस्थिती ६३.३० टक्के नोंदवली गेली. एकूण सरासरी उपस्थिती ८४ पूर्णांक ३८ टक्के इतकी होती. विधानसभेत पुरस्थापित १३ शासकीय विधेयके मांडण्यात आली. १५ शासकीय विधेयके विधानसभेत संमत करण्यात आली आहेत.

हेही वाचा-Kirit Somaiya in Dapoli : अनिल परब यांचे रिसोर्ट तोडण्यावरून सोमय्या आक्रमक; भाजपा कार्यकर्ते दापोलीकडे रवाना

विधिमंडळात झालेले कामकाज
विधिमंडळात ६ हजार ६९८ तारांकित प्रश्न मांडण्यात आले. त्यापैकी ६९६ प्रश्न स्वीकृत करण्यात आले. तर सभागृहात ६४ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. १७८७ लक्षवेधी सूचना सभागृहाला प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २७४ सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. तर ८० लक्षवेधी सूचनांवर सभागृहात चर्चा झाली.
नियम ९७ च्या सूचनांवर चर्चा नाही
सभागृहात नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेसाठी ६८ सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी एकही सूचना नाकारण्यात आली नाही किंवा एकाही सूचनेवर सभागृहात चर्चा झाली नाही. तसेच प्रश्नांच्या उत्तरातून उद्भवलेल्या प्राप्त सूचनासाठी अर्धा तास चर्चा ७३ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ६३ सूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. मात्र एकाही अर्धा तास चर्चेच्या सूचनेवर चर्चा झाली नाही. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर १८८ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ३२ सूचना स्वीकारण्यात आल्या होत्या. मात्र केवळ ६ सूचनांवर चर्चा झाली.

Last Updated : Mar 26, 2022, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.