ETV Bharat / city

अँटिलिया स्फोटके प्रकरणातील आरोपींना आरोप पत्राच्या प्रती देण्याकरिता 40 लाख रुपये खर्च येणार, एनआयएची कोर्टात माहिती - UPA law

पुराव्यांत मोठ्या प्रमाणात डिजिटल पुराव्याचा समावेश आहे. त्यात मुंबई आणि ठाणे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेले चित्रिकरणही आहे. तसेच दूरध्वनी नोंदी आणि त्यांच्या संभाषणाच्या लाखो प्रतींचाही समावेश असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या प्रकरणात १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर अशा बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत ( UPA law ) कलमे लावण्यात आली आहेत.

Antilia explosives case
अँटिलिया स्फोटक प्रकरण
author img

By

Published : Aug 4, 2022, 10:10 AM IST

मुंबई-प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटके ( Antilia explosives case ) तथा मनसुख हिरेन संशयास्पद ( Mansukh hiren murder case ) मृत्यू प्रकरणातील आरोपीं विरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्रा सर्व पुराव्यांच्या प्रती मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठीचा खर्च आणि लागणाऱ्या वेळेमुळे आरोपींना देणे शक्य नाही. आरोप पत्राची प्रती देण्याकरिता एनआयएला तब्बल 40 लाख रुपयाचा खर्च येणार असल्याचे एनआयएने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टामध्ये ( NIA Antilia case ) अर्जाद्वारे सांगितले आहे.

एनआयएने न्यायालयात केलेल्या अर्जात असे म्हटले आहे, की हे पुरावे आरोपींना उपलब्ध करण्यासाठी ( NIA on Antilia case in court ) 40 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा खर्च परवडणारा नसल्याचे एनआयएतर्फे विशेष न्यालयाला सांगण्यात आले आहे. शिवाय या प्रती आरोपींना उपलब्ध करण्यासाठी 258 दिवस म्हणजेच 8 महिने किंवा त्याहून अधिकचा वेळ लागेल, असा दावा एनआयएने केला आहे. पुराव्यांत मोठ्या प्रमाणात डिजिटल पुराव्याचा समावेश आहे. त्यात मुंबई आणि ठाणे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेले चित्रिकरणही आहे. तसेच दूरध्वनी नोंदी आणि त्यांच्या संभाषणाच्या लाखो प्रतींचाही समावेश असल्याचा दावा एनआयएने केला आहे. या प्रकरणात १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कठोर अशा बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) कलमे लावण्यात आली आहेत.

.

सुमारे 10 हजार पानांचे आरोपपत्र- राष्ट्रीय तपास पथकाने विशेष न्यायालयात निलंबित पोलीस सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आरोप पत्रांमध्ये दोनशे साक्षीदारांची यादी असून १६४ साक्षीदारांचा जबाब दंडाधिकारी न्यायालयात नोंदवलेला आहे. कोरोनामुळे एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा जादा अवधी न्यायालयात मागितला होता. ही मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी न्यायालयात एनआयएने सुमारे 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. वाझेसह नरेश गोर, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोतकरी, मनीष सोनी, आणि प्रदीप शर्मा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

अशी केली कारवाई- या प्रकरणात तीन एफआयआर दाखल असून स्काॅर्पियो स्फोटक प्रकरण, स्काॅर्पियो गाडी चोरी आणि मनसुख हिरन म्रुत्यु यावर आरोप आहेत. एनआयएने हत्या, कटकारस्थान, अपहरण, धमकी देणे, सामाजिक शांतता भंग करणे, इ. भादंवि कलम 120 ब, 201, 286, 302, 364, 384, 386, 403, 419, 506 इ. यूएपीए अंतर्गत कलम 16, 18, 20 आणि हत्यारे आणि स्फोटके कायद्यानुसार आरोप दाखल केले आहेत. मागील वर्षी 2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कौर्पियो गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकिचे पत्र मिळाले होते. या गाडिचा ताबा ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन यांच्याकडे होता. मात्र मार्चमध्ये त्यांचाही म्रुतदेह ठाणे खाडित आढळला होता. प्रारंभी वाझे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करीत होता. मात्र एनआयएने तपास सुरू केला आणि या प्रकरणात वाझेलाच प्रमुख आरोपी केले. तसेच पोलीस दलातील अन्य काही जणांसह दहा आरोपी यामध्ये अटकेत आहेत. शर्माला देखील एन आय एने अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आतापर्यंत 1. सचिन वाझे, 2. विनायक शिंदे, 3. रियाझ काझी, 4. सुनील माने, 5. नरेश गोर, 6. संतोष शेलार, 7. आनंद जाधव व 8. प्रदीप शर्मा या आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.