ETV Bharat / city

उत्कृष्ट कार्याबद्दल अग्निशमन दलातील 4 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक - fort invident

मागील वर्षी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजून 43 मिनीटांनी फोर्ट येथील भानुशाली इमारत सहा मजली निवासी व वाणिज्य वापरातील इमारतीचा दक्षिण पूर्वकडील संपूर्ण भाग कोसळला होता. ढिगाऱ्याखाली इमारतीतील अनेक रहिवासी गाडले गेले होते. इमारतीचा उर्वरित भाग व छत अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकत होते.

fire brigade
अग्निशमन दल
author img

By

Published : Aug 15, 2021, 8:48 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली इमारतीचा काही भाग मागील वर्षी कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणि इमारतीत अडकले 27 रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन अग्निशमन दलातील चार अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकाची घोषणा करण्यात आली आहे. आज 15 ऑगस्टला त्यांना नवी दिल्ली येथे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. तर दोन अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांचे रजत पदक बहाल करण्यात आले आहे.

27 जणांना सुखरूप बाहेर काढले
मागील वर्षी 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजून 43 मिनीटांनी फोर्ट येथील भानुशाली इमारत सहा मजली निवासी व वाणिज्य वापरातील इमारतीचा दक्षिण पूर्वकडील संपूर्ण भाग कोसळला होता. ढिगाऱ्याखाली इमारतीतील अनेक रहिवासी गाडले गेले होते. इमारतीचा उर्वरित भाग व छत अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकत होते. अशा परिस्थितीत आपल्या प्राणांची पर्वा न करता मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेले 15 रहिवासी व इमारतीतील अडकलेले 12 रहिवासी अशा 27 जणांना या सगळयांची अथक प्रयत्नांनी सुटका केली.

यांना पदक -
मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी या प्रसंगी दाखविलेल्या अतुलनीय शौर्य, व्यवसाय कुशलता व कर्तव्य परायणता याकरीता प्रभात सुरजलाल रहांगदळे, उप आयुक्त (आ.व्य.), हेमंत दत्तात्रय परब, प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी), आत्माराम जगदंबाप्रसाद मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी, कृष्णात रामचंद्र यादव, विभागीय अग्निशमन अधिकारी यांना राष्ट्रपदी पदक घोषित आले आहे. त्याचप्रमाणे अनिल पवार, केंद्र अधिकारी, बाळासाहेब राठोड यांना पालिका आयुक्तांचे रजत पदक बहाल करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.