ETV Bharat / city

Todays Top News in Marathi : आजच्या टॉप न्यूज, वाचा एका क्लिकवर - आजच्या मराठी टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
टॉप न्यूज
author img

By

Published : Jan 4, 2022, 7:11 AM IST

आज दिवसभरात -

  • भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई - भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे हे संशयित आरोपी आहेत. यापूर्वी सिंधुदुर्ग न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

  • मुंबईत भाजपचे आंदोलन

मुंबई - महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्टमध्ये बदल करण्याच्या विरोधात भाजपचे मुंबई महाविद्यालय गेट समोर विद्यार्थी आंदोलन. भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजय चोकसी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

  • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे उपस्थित असणार आहेत.

  • पुणे जिल्हा कोरोना आढावा बैठक

पुणे - पुणे जिल्ह्याची आज कोरोना आढावा बैठक घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर या आढावा बैठकीला महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

  • कंगना रणौतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणीवर याचिकेवर सुनावणी

मुंबई - जावेद अख्तर यांच्याकडून अभिनेत्री कंगना रणौतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • आजचे राशीभविष्य वाचा -

VIDEO : 04 January Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

04 January Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज परदेशी जाण्याची संधी लाभेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

काल दिवसभरात -

  • Mahavikas Aghadi Alliance formula in Goa : गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करणार - संजय राऊत

पणजी - महाराष्ट्र राज्याप्रमाणे गोव्यातही विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) महाविकास आघाडी स्थापन (Mahavikas Aghadi in Goa) करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी सांगितले आहे. ते दोन दिवस गोवा दौऱ्यावर (Sanjay Raut in Goa) आहेत. संजय राऊत हे आज काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत बोलणी करणार आहेत.

  • Maharashtra omicron Cases - राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे 68 तर कोरोनाचे 12 हजार 160 नवे रुग्ण

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात निर्बंध कठोर लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (दि. 3 जानेवारी) दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन बाधितांचे निदान ( Maharashtra Corona Cases ) झाले. तर 11 रुग्णांचा आज मृत्यू झाला. दुसरीकडे ( Maharashtra Omicron Cases ) ओमायक्रॉनचे 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

  • Share Market on Years First day : नव्या वर्षात पहिल्या दिवशीच शेअर बाजारात उसळी

मुंबई - नवीन वर्षाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशीच मुंबई शेअर बाजारांमध्ये ( Mumbai share market on 3rd Jan 2021 ) 900 अंशांची उसळी पाहायला मिळाली. यामुळे मुंबई शेअर बाजारात उत्साहाचे आणि तेजीचे वातावरण होते.

  • Bulli Bai App Case : मुंबई सायबर सेलकडून 21 वर्षीय विद्यार्थ्याला बंगळुरूमधून घेतले ताब्यात

मुंबई - सध्या सोशल मीडियावर 'बुल्ली बाई' (Bulli Bai App Case) या App मुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणातील एका संशयिताला मुंबई पोलिसाच्या सायबर सेलने (Mumbai Police Cyber Cell) सोमवारी (3 जानेवारी) बंगळुरूमधून ताब्यात घेतले (suspect detained from Bengaluru) आहे. या संशयिताला आता मुंबईला आणले जाणार आहे. हा संशयित बुल्ली बाई App ला फॉलो करणाऱ्या पाच जणांपैकी एक आहे. त्यामुळे त्याला अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • Jaleel Criticized Danve : रावसाहेब दानवे देशाचे मंत्री की जालन्याचे?, अनेक प्रकल्प पळवले; खासदार जलील यांचा आरोप

औरंगाबाद - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) देशाचे मंत्री आहेत की जालन्याचे? त्यांनी लोकसभा ऐवजी जालना नगरपालिका निवडणूक लढवावी, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.