ETV Bharat / city

Central Railway Megablock : मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर ३६ तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - मध्य रेल्वे मेगा ब्लॉक रेल्वे रद्द

मध्ये रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी 36 तासांचा मेगाब्लॉक शनिवारी दुपारी २ वाजेपासून ते सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ( Central Railway Megablock Time ) असणार आहे. परिणामी लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या ( Central Railway Mail Express Cancle ) रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात ( Central Railway Timetable Change ) बदल करण्यात आला आहे.

Central Railway Megablock
Central Railway Megablock
author img

By

Published : Jan 7, 2022, 7:32 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेवरील ( Central Railway Megablock ) ठाणे ते दिवा ( Thane To Diva ) पाचवी आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कळवा ( Thane To Kalwa ) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी दुपारी २ वाजेपासून ते सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ( Central Railway Megablock Time ) असणार आहे. परिणामी लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या ( Central Railway Mail Express Cancle ) रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात ( Central Railway Timetable Change ) बदल करण्यात आला आहे.

असा असेल ३६ तासाचा मेगाब्लॉक -

या मेगा ब्लॉकदरम्यान शनिवारी दुपारी १ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या, अर्धजलद सेवा कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाही. पुढे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. दुपारी २ नंतर अप धीमी-अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील. शनिवारी दुपारी १२.५४ ते १.५२ वाजेपर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या-अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. दुपारी २.०० नंतर, डाउन धिम्या-अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

असे होणार काम -

या ब्लॉक कालावधीत ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखालील नवीन टाकलेला ट्रॅक कट करून सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगच्या संदर्भात रुळावरील डिरेलींग स्विच तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व चालू करण्याची कामे ब्लॉक कालावधीत केली जातील. ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट-ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, १ डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाणार आहे.

शुक्रवार-शनिवार या गाड्या रद्द -

  • 12112 अमरावती- मुंबई एक्सप्रेस
  • 12140 नागपूर -मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस
  • 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

शनिवार- रविवारी या गाड्या रद्द -

  • 11007 / 11008 मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस
  • 12071 / 12072 मुंबई-जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
  • 12109 /12110 मुंबई- मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस
  • 11401 मुंबई- आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस
  • 12123 /12124 मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन
  • 12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस
  • 12139 मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस
  • 11139 मुंबई - गदग एक्सप्रेस
  • 17612 मुंबई- नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

रविवार-सोमवार या गाड्या रद्द -

  • 11402 आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
  • 11140 गदग -मुंबई एक्सप्रेस

पुणे येथे गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन -

पुणे येथून शुक्रवारी आणि शनिवारी सुटणाऱ्या 17317 हुबळ्ळी-दादर एक्सप्रेस आणि 11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेशन करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय शनिवारी आणि रविवारी सुटणाऱ्या 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि 17318 दादर-हुबळ्ळी एक्सप्रेस पुण्याहून गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Malegaon Bomb Blast Case : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधातील साक्षीदाराने फिरवली साक्ष, ATS वर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.