ETV Bharat / city

महागाईचा फटका पालिकेला, अळीनाशक तेलाच्या खरेदीसाठी ३ कोटीं अधिकचा खर्च - धूर फवारणी

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुण्या, हत्तीरोग यासारखे साथीचे आजार पसरतात. या आजारांना रोखण्यासाठी पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून मुंबईत मच्छर, डास आणि त्यांच्या आळ्या नष्ट केल्या जातात. धूर फवारणी केली जाते तसेच गटारे आणि साचलेल्या इतर पाण्यात तेल टाकले जाते. यामुळे मच्छरांची उत्पत्ती रोखली जाते. यासाठी पालिका दरवर्षी ११ लाख लिटर अळीनाशक तेल लागते २०१९-२२ या ३ वर्षांसाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने दरवर्षी ११ लाख याप्रमाणे ३३ लाख लिटर अळीनाशक तेल खरेदी केले होते. यासाठी पालिकेने मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीला २७ कोटी २५ लाख रुपये अदा केले होते. या कंत्राटकामाची मुदत ३१ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे पालिकेने नव्याने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ ते २०२५ या ३ वर्षांसाठी प्रति लिटर ९२.०४ रुपये या दराने एका वर्षासाठी ११ लाख याप्रमाणे ३ वर्षासाठी ३३ लाख लिटर अळीनाशक तेल खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिका ३० कोटी ३७ लाख रुपये खर्च करणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 22, 2021, 8:26 PM IST

मुंबई - वाढती महागाई, विविध प्रकारचे तेल, गॅसचे वाढते दर यामुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. मात्र, या महागाईचा फटका सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही बसत आहे. मुंबईत पावसाळी आजार रोखण्यासाठी मच्छर, डास आणि त्याच्या आळ्या नष्ट केल्या जातात. पालिकेकडून धूर फवारणी तसेच साचलेल्या पाण्यात अळीनाशक तेल टाकले जाते. वाढत्या महागाईमुळे पालिकेला मागील खरेदीपेक्षा ३ कोटी ११ लाख अधिक देऊन पुढील तीन वर्षासाठी हे तेल खरेदी करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

दरवर्षी ११ लाख लिटर अळीनाशक तेल -

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुण्या, हत्तीरोग यासारखे साथीचे आजार पसरतात. या आजारांना रोखण्यासाठी पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून मुंबईत मच्छर, डास आणि त्यांच्या आळ्या नष्ट केल्या जातात. धूर फवारणी केली जाते तसेच गटारे आणि साचलेल्या इतर पाण्यात तेल टाकले जाते. यामुळे मच्छरांची उत्पत्ती रोखली जाते. यासाठी पालिका दरवर्षी ११ लाख लिटर अळीनाशक तेल भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीकडून खरेदी करते. दर ३ वर्षांनी या अळीनाशक तेलाची खरेदी करण्यासाठी कंत्राट दिले जाते.

३ वर्षासाठी ३० कोटी ३७ लाख रुपये खर्च -

२०१९-२२ या ३ वर्षांसाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने दरवर्षी ११ लाख याप्रमाणे ३३ लाख लिटर अळीनाशक तेल खरेदी केले होते. यासाठी पालिकेने मे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीला २७ कोटी २५ लाख रुपये अदा केले होते. या कंत्राटकामाची मुदत ३१ मार्च, २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. यामुळे पालिकेने नव्याने कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ ते २०२५ या ३ वर्षांसाठी प्रति लिटर ९२.०४ रुपये या दराने एका वर्षासाठी ११ लाख याप्रमाणे ३ वर्षासाठी ३३ लाख लिटर अळीनाशक तेल खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिका ३० कोटी ३७ लाख रुपये खर्च करणार आहे.

३ कोटी ११ लाख रुपये अधिकचा खर्च -

पालिकेने २०१९-२२ या ३ वर्षांसाठी प्रति लिटर ८२.६० रुपये या दराने ३३ लाख लिटर तेल खरेदी करण्यात आले होते. त्यासाठी पालिकेने २७ कोटी २५ लाख रुपये खर्च केले होते. २०२२ ते २०२५ या ३ वर्षांसाठी प्रति लिटर ९२.०४ रुपये या दराने ३३ लाख लिटर तेल खरेदी केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेला ३० कोटी ३७ लाख रुपये एवढी रक्कम अदा करावी लागणार आहे. पालिकेला मागील खरेदीपेक्षा प्रति लिटर मागे ९.४४ रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. तसेच या तेलाच्या खरेदीसाठी पालिकेला ३ कोटी ११ लाख रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे.

हे ही वाचा - CM Assistance Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 600 कोटी रुपये वापराविना पडून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.