ETV Bharat / city

मुंबईत बुधवारी 29 हजार 607 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत बुधवारी 29 हजार 607 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 25 हजार 926 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 681 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 28 लाख 87 हजार 710 लाभार्थ्यांना लस देण्यात आली, त्यात 21 लाख 62 हजार 572 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 25 हजार 138 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत बुधवारी 29 हजार 607 लाभार्थ्यांचे लसीकरण
मुंबईत बुधवारी 29 हजार 607 लाभार्थ्यांचे लसीकरण
author img

By

Published : May 20, 2021, 6:24 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेदरम्यान तौक्ते वादळामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मंगळवारी 16 हजार 754 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर बुधवारी 29 हजार 607 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 28 लाख 87 हजार 710 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत बुधवारी 29 हजार 607 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 25 हजार 926 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 681 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 28 लाख 87 हजार 710 लाभार्थ्यांना लस देण्यात आली, त्यात 21 लाख 62 हजार 572 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 25 हजार 138 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 99 हजार 162 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 56 हजार 811 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 55 हजार 403 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 10 लाख 11 हजार 475 तर 18 ते 44 वर्षामधील 64 हजार 859 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. पुढील आठवड्यात सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. लसीच्या तुटवड्यामुळे शनिवार 15 मे आणि रविवार 16 मे असे दोन दिवस लसीकरण बंद होते. तर सोमवारी 17 मे ला तौक्ते चक्रीवादळामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,99,162
फ्रंटलाईन वर्कर - 3,56,811
जेष्ठ नागरिक - 11,55,403
45 ते 59 वय - 10,11,475
18 तर 44 वय - 64,859
एकूण - 28,87,710

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.